Aai Kuthe Kaay Karte Serial Updates :  स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेक्षकांची पसंती मिळालेल्या 'आई कुठं काय करते' या  मालिकेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. ही मालिका आता  प्रेक्षकांचा निरोप घेणार का, अशी चर्चा सुरू आहे. सध्या या मालिकेत काही ट्वीस्ट येत आहेत. मालिका संपण्याची चर्चा एका कारणाने सुरू झाली आहे. 'आई कुठं काय करते'या मालिकेच्या वेळेत नवीन मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे, ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 


सध्या छोट्या पडद्यावर टीआरपीची मोठी स्पर्धा सुरू आहे. स्टार प्रवाह वाहिनी मागील 175 आठवड्यांपासून टीआरपीमध्ये अव्वलस्थानी आहे. इतर वाहिन्यांकडूनही नव्या मालिका सुरू करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे आता स्टार प्रवाहकडूनदेखील स्ट्रॅटेजी आखली जात आहे. 


'आई कुठं काय करते'च्या वेळेत नवी मालिका


'आई कुठं काय करते' या मालिकेच्या वेळेत स्टार प्रवाहवर नवी मालिका सुरू होणार आहे. घरोघरी मातीच्या चुली ही नवी मालिका सुरू होत आहे. पुढील महिन्यात 18 मार्चपासून ही मालिका सोमवार ते शनिवार दरम्यान संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे आता 'आई कुठं काय करते' ही मालिका बंद होणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 






'आई कुठं काय करते' मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात नवं वादळ


सध्या 'आई कुठं काय करते' या मालिकेत प्रत्येक पात्राच्या आयुष्यात काही ना काही उलथापालथी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आशुतोषसोबत नवा संसार सुरु केल्यानंतर अरुंधतीच्या वाट्याला रोज नवं काहीतरी येत होतं. तर आता पुन्हा एकदा तिच्या संसारात एक नवं वादळ आल्याचं पाहायला मिळत आहे. 


'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये रेश्मा शिंदे प्रमुख भूमिकेत 


नव्याने सुरू होणाऱ्या 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत जानकी हे महत्त्वाचं पात्र रेश्मा शिंदे साकारणार आहे. ‘रंग माझा वेगळा' या मालिके रेश्माची मुख्य भूमिका होती. ही मालिका कौटुंबिक जिव्हाळा, नातेसंबंधावर भाष्य करणारी असणार आहे.