Tejashree Pradhan On Kalavantancha Ganesh : गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) अवघ्या काही दिवसांवर आला आहे. घरोघरी बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधानने (Tejashree Pradhan) बाप्पासोबतचं तिचं नातं शेअर केलं आहे. गपणती बाप्पा बुद्धीची देवता असून आजही मी त्याच्याकडे बुद्धी मागते असं अभिनेत्री म्हणाली.


बुद्धीच्या देवताकडे आजही मी बुद्धी मागते : तेजश्री प्रधान


तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. एबीपी माझाशी गणपतीबद्दल बोलताना तेजश्री म्हणाली,"गणपती बाप्पा मला लहानपणापासूनच खूप जवळचा वाटतो. गणपतीला बुद्धीची देवता असं म्हटलं जातं. त्यामुळे शाळेत असतानाच अभ्यास करताना त्याच्यासोबत मी सेटिंग लावली आहे".


तेजश्री म्हणाली,"देवबाप्पा बुद्धी दे' असं आपण लहानपणापासून म्हणत आलो आहोत. खरंतर ही बुद्धी फक्त शिक्षणापुरती मर्यादीत नसते. तर आयुष्याच्या प्रत्येक पावलावर हवी असते. त्यामुळे बाप्पा मला बुद्धी दे असं मला सतत म्हणायचं आहे.माझ्या काकांकडे पाच किंवा सात दिवसांचा गणपती असतो. प्रत्येक क्षणी बाप्पा माझ्या पाठीशी आहे, असं मला वाटत राहतं. बाप्पावर माझा खूप विश्वास आहे. माझ्या आनंदात आणि दु:खात बाप्पा कायम माझ्या सोबत असतो". 






तेजश्री पुढे म्हणाली,"लहानपणी मी ज्या सोसायटीत राहायचे, त्या सोसायटीत आमचा सार्वजनिक गणपती असायचा. त्यावेळी दरवर्षी विसर्जनाला डान्स करणं,मज्जा करणं या गोष्टी मला प्रचंड आवडायच्या. त्यावेळचं प्रत्येक विसर्जन आजही माझ्या आठवणीत आहे. व्यावहारी जगातली उंची बाजूला ठेऊन कुठेतरी आपल्याला फक्त माणूस म्हणून छान जगता आलं पाहिजे. कोणाच्याही नजरा तुमच्यावर नाहीत हे आता मी खूप मीस करते. बाप्पा येणार असल्याने आता त्याच्या स्वागताच्या तयारी सुरू केली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्यावर आमचा भर आहे. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून बाप्पाची आरास बनवणार आहोत". 


तेजश्री प्रधानने 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेच्या माध्यमातून मालिका विश्वात पदार्पण केलं आहे. 'होणार सून मी ह्या घरची' ही तिची मालिका चांगलीच गाजली. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 


संबंधित बातम्या


Hardeek Joshi : हार्दिक जोशीसाठी यंदाचा गणेशोत्सव असणार स्पेशल; म्हणाला,"अक्षयाच्या पद्धतीने..."