Tanushree Dutta FIR Against Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutt) आणि बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्यातील वादात आता नवा ट्विस्ट आला आहे. दोघांनीही एकमेकींवर अनेक आरोप केले आहेत. आता राखी सावंतमुळे आपल्या प्रतिमेला धक्का बसू नये यासाठी तनुश्रीने कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे. अभिनेत्रीने राखीविरोधात ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार (FIR) दाखल केली आहे.


तनुश्रीची राखी सावंत विरोधात तक्रार दाखल


राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर मीडियासोबत बोलताना तनुश्री म्हणाली,"मी राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केली आहे. 2018 मध्ये मी टू (MeeToo) या चळवळीदरम्यान तिने मला खूप त्रास दिला. आता या प्रकरणी पोलिसांनी ड्रामाक्वीन विरोधात अनेक कलमाअंतर्गत तक्रार दाखल केली आहे". 


तनुश्री पुढे म्हणाली,"माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची मी पोलिसांना माहिती दिली आहे. त्यानुसार पोलीस या प्रकरणाची दखल घेत आहेत. तसेच योग्य कारवाईही करतील". 


'या' कारणाने तनुश्री-राखीचं झालेलं भांडण


राखी सावंतबद्दल बोलताना तनुश्री म्हणाली,"एका गाण्यातून निर्मात्यांनी राखी सावंतला काढलं होतं आणि मला विचारणा केली होती. या एका कारणाने राखीने माझ्यासोबत भांडायला सुरुवात केली. त्यामुळे निर्मात्यांनी पुन्हा त्या प्रोजेक्टमधून मला काढलं आणि राखीला घेतलं. अखेर आजपर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही". 


तनुश्रीने नाना पाटेकरांवरही केली टिका


तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवरही (Nana Patekar) टीका केली आहे. नानांसोबत भाष्य करत ती म्हणाली,"नाना पाटेकर यांची इंडस्ट्रीतील प्रतिमा चांगली नाही. फोटो-व्हिडीओच्या माध्यमातून ते समाजसेवा करतात. अनेक अभिनेत्रींसोबत त्यांचं अफेअर होतं. कुटुंबियांसोबतही ते राहत नाहीत. 'नाना पाटेकर यांचा भाऊ मन्या सुर्वे हा लोकप्रिय गँगस्टर आहे, मी केलेल्या या आरोपानंतर माझ्यावर अनेकदा हल्ला झाला.. धमक्या देण्यात आल्या". 


राखी सावंतचा व्हिडीओ व्हायरल (Rakhi Sawant Video)


तनुश्रीने राखी सावंत विरोधात एकीकडे तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे 'ड्रामा क्वीन'चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. राखीने गोणपाटाचा वापर करत खास लूक केला होता. तिच्या या व्हिडीओवर उर्फी जावेदला टक्कर, उर्फी तू कुठे आहेस? अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 






संबंधित बातम्या


Tanushree Dutta: "इतके धर्म बदलूनही ती..."; तनुश्री दत्तानं राखी सावंतवर केले गंभीर आरोप