Adil Durrani-Tanushree On Rakhi Sawant: राखी सावंत (Rakhi Sawant) आणि आदिल खान दुर्रानी (Adil Durrani) यांचा एकमेकांशी असलेला वाद वाढत आहे. राखी आणि आदिल यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.आता आदिलच्या समर्थनार्थ बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता पुढे आली आहे. तनुश्री दत्तानं आदिल खानला सपोर्ट करुन राखी सावंतवर काही गंभीर आरोप केले आहेत.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये तनुश्री सांगितलं की, ' मी टू आंदोलनादरम्यान राखी सावंतने माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला होता. राखी मनोरुग्ण आहे आणि तिनं माझ्यावर शाब्दिक हल्ला केला. त्यामुळे माझे मानसिक आरोग्य खराब झाले.'
रिपोर्टनुसार, तनुश्रीने राखीची काही जुनी प्रकरणे शोधून काढली. त्याबाबत तनुश्री म्हणाली, "ओल्ड विक्टिमला राखीला अजिबात तोंड द्यायचे नव्हते, ते तिच्याबद्दल खूप वाईट बोलते. दोन मुलांच्या आत्महत्येची प्रकरणे आहेत आणि यामुळे राखीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता." पुढे आदिलनं याबाबत सांगितलं, "हे प्रकरण 4 वर्षे चालले पण नंतर हे प्रकरण संपले कारण त्या व्यक्तीचे आई-वडील राखीसोबत भांडू शकत नव्हते."
तनुश्रीने पुढे सांगितलं, " तिच्यात आक्रमकता आहे, ती एखाद्या आक्रमक माणसासारखी लढते. मी पाहिले की, आदिल आणि राजश्रीच्या बाबतीतदररोज खोटे बोलण्यासाठी तिच्याकडे एक नवीन व्यक्ती असतो. ते व्यक्ती कुठून येतात माहीत नाही."
"इतके धर्म बदलूनही ती स्वतःला बदलू शकली नाही. मी अनेकदा ऐकले आहे की, तिला आपण पकडले जाऊ असे समजल्यावर ती माघार घेते. अचानक ती तिच्या अडचणींबद्दल बोलते." असंही तनुश्रीनं सांगितलं.
आदिल राखीला त्याच्या आई-वडिलांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जबाबदार ठरवले. तो म्हणाला, राखीमुळे माझ्या आई-वडिलांना बीपी आणि मधुमेहाचा त्रास झाला आहे. तिने मला कोणतेही खरे कारण नसताना तुरुंगात टाकले, जेव्हा मला तुरुंगात टाकण्यात आले तेव्हा माझ्या आई-वडिलांची काय परिस्थिती झाली असेल? याची तुम्ही सर्वजण कल्पना करू शकता.मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, तो माझ्या आई बाबांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी खेळला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्याने माझ्यावर केलेल्या आरोपांमुळे माझ्या आई-वडिलांना त्रास झाला आहे.'
इतर महत्वाच्या बातम्या: