Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी झील मेहता (Jheel Mehta) सध्या चर्चेत आहे. झील मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री अनेक दिवसांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. झीलला आपल्या स्वप्नातला राजकुमार मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी झील मेहताला बॉयफ्रेंड आदित्य दुबेने (Aditya Dube) खास सरप्राइज देत प्रपोज केलं होतं. पण आता झीलने त्याला प्रपोज केलं आहे. या ड्रीमी प्रपोजलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


झील मेहता अनेक दिवसांपासून आदित्य दुबेला डेट करत आहे. काही महिन्यांपूर्वीच बॉयफ्रेंड आदित्यने सरप्राइज देत तिला प्रपोज केलं होतं. अशातच आता झीलने त्याला प्रपोज केलं आहे. या ड्रीमी प्रपोजलचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. झीलने फोटो शेअर करत लिहिलं आहे,"मी तुझ्यासोबत असताना एका वेगळ्याच जगात असते. जगात कुठेही गेले तरी तुझ्यापाशी येऊन थांबते. स्वप्न सत्यात उतरवल्याबद्दल आभार".






फोटोमध्ये झील बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक अंदाजात दिसून येत आहे. पांढऱ्या रंगाच्या मिडी ड्रेसमध्ये झील खूपच सुंदर दिसत आहे. झीलने गुडघ्यावर बसून आदित्यला प्रपोज केलं आहे आणि त्याला हिऱ्याची अंगठी घातली आहे. समुद्रकिनारी झील आणि आदित्यचा रोमाँटिक अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. झील आणि आदित्यचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.


सोनूच्या फोटोवर अभिनंदानाचा वर्षाव


सोनूच्या फोटोवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. झीलने 2008 मध्ये पहिल्यांदा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत सोनूची भूमिका साकारली होती. पुढे अभ्यासाचं कारण देत सोनूने मालिकेला रामराम केला. झील सध्या इंडस्ट्रपासून दूर असून आपला व्यवसाय करत आहे. झील सेफ स्टुडंट हाऊसिंग नामक कंपनी चालवते. या कंपनीच्या माध्यमातून बाहेरुन मुंबईत आलेल्या मुलांना आसरा देण्याचं काम ती करते. झीलचा होणारा पती आदित्य हा गेमिंग इंडस्ट्रीसोबत जोडलेला आहे. झील अनेकदा आदित्यसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. झील-आदित्यच्या लग्नाची तारिख अद्याप समोर आलेली नाही. 


संबंधित बातम्या


Gurucharan Singh Missing : 'मी दोन-तीन दिवसांतच परत येईन', गुरुचरणचे वडिलांना शेवटचे शब्द; परत येण्याचंही दिलं होतं वचन