Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 16 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेत दयाबेनचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वाकाणीच्या (Disha Vakani) कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या सहा वर्षांपासून ती मालिकेपासून दूर आहे. पण आता या मालिकेत पुन्हा प्रेक्षकांच्या लाडक्या दयाबेनची एन्ट्री होणार असल्याचं समोर आलं आहे.


'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. मालिकेचा प्रत्येक एपिसोड चाहते आवडीने पाहतात. तसेच मालिकेतील पत्येक पात्रावर प्रेम करतात. जेठालाल, पोपटलाल आणि भिडे यांची जुगलबंदी प्रेक्षकांना आवडते. पण या मालिकेचं लक्षवेधी पात्र म्हणजे दयाबेन. गेल्या सहा वर्षांपासून प्रेक्षक या पात्राला मिस करत आहेत. 


दयाबेनची भूमिका दिशा वकानीने खूपच चांगली निभावली. प्रेग्नंसीमुळे तिने 2017 मध्ये मालिकेतून ब्रेक घेतला. सध्या ती मनोरंजनसृष्टीपासून दूर असून आपल्या लेकीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसते. पण दयाबेनला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दयाबेनची लवकरच गोकुळधाम सोसायटीत एन्ट्री होणार आहे.


दयाबेन पुन्हा गाजवणार छोटा पडदा


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या भागात सुंदरलाल मुंबईत आपल्या जिजूला भेटायला आलेला पाहायला मिळालं. दरम्यान सुंदर म्हणतो की,"दिवाळीत ती नक्की येईल". 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत सध्या दयाबेनच्या कमबॅकची चर्चा आहे. महिला मंडळही बापूजींकडे दयाबेन कधी येणार याची चौकशी करताना पाहायला मिळालं आहे.


दयाबेनला पुन्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक


दयाबेनचं मालिकेत पुन्हा कमबॅक होणार असल्याने चाहते उत्सुक आहेत. जबरदस्त धमाकेदार", दयाबेनच्या कमबॅकसाठी आम्ही उत्सुक आहोत, आता पुन्हा दयाबेन आणि जेठालालची कॉमेडी पाहायला मिळणार, दिवाळीचा एपिसोड पाहायलाच हवा, आता फक्त दयाबेनला पाहण्याची प्रतीक्षा, दिशा वकानी खरचं काम करणार आहे का?, अशा कमेंट्स दिशाच्या चाहत्यांनी आणि मालिकाप्रेमींनी केल्या आहेत. 


दिशाने आपला अभिनय, मजेदार संवाद आणि गरबा नृत्याने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेचे प्रेक्षक त्यांच्या लाडक्या ‘दया बेन’ची म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीची वाट पाहत आहेत. दिशा बाळाच्या स्वागतासाठी ब्रेकवर गेली होती, त्यानंतर अद्याप ती शोमध्ये परतलेली नाही.


संबंधित बातम्या


Taarak Mehta ka ooltah chashmah: दयाबेन नंतर आता जेठालाल घेणार मालिकेतून ब्रेक? चाहत्यांना झटका