Taarak Mehta ka ooltah chashmah: दयाबेन नंतर आता जेठालाल घेणार मालिकेतून ब्रेक? चाहत्यांना झटका
तारक मेहता मधील जेठालाल म्हणजेच सर्वांचे लाडके अभिनेते दिलीप जोशी शोमधून ब्रेक घेणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाचा खुलासा खुद्द दिलीप जोशी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जेठालालची भूमिका साकारणारा दिलीप जोशी आपल्या कुटुंबासह टांझानियाला धार्मिक सहलीला जाणार आहेत. यादरम्यान ते अबुधाबीलाही जाणार आहेत.
अशा परिस्थितीत आता दिलीप जोशी काही दिवस शोमधून ब्रेक घेणार असल्याची चर्चा आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून शोचा मुख्य पात्र असणारे जेठालाल काही काळ गायब होणार आहेत.
या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे, पण या शोची मुख्य व्यक्तिरेखा जेठालाल सर्वांच्या पसंतीस उतरली आहे.
दिलीप जोशी, म्हणजेच जेठालाल काही काळ शोमधून गायब झाल्यास त्यांचे चाहते निराश होऊ शकतात.
जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी त्यांच्या शेड्युलमधून या सहलीनिमित्ताने छोटा ब्रेक घेतला आहे.
काही दिवसांनी जेठालाल पुन्हा मालिकेत दिसतील.
त्यामुळे जेठालाल परत येईपर्यंत त्यांचे ताहते त्यांना मिस करणार आहेत.