Dobaaraa Release Date : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आश्चर्यचकित करते. प्रत्येक वेळी हटके फिल्म निवडून तापसीने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 'दोबारा' (Dobaaraa) या चित्रपटातून तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. या चित्रपटात तापसीबरोबर पावेल गुलाटी दिसणार आहे. दोघांनी यापूर्वी थप्पड या चित्रपटात एकत्र काम केले आहे.


ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर दोबारा रिलीज डेटची माहिती दिली आहे. तापसी आणि पावेलचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले - तापसी आणि अनुराग कश्यपच्या दोबारा या चित्रपटाची रिलीज डेट फायनल झाली आहे. हा चित्रपट 19 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर, गौरव बोस आणि सुनीर खेत्रपाल यांनी केली आहे.






'दोबारा' हा सध्याच्या काळातील थ्रिलर चित्रपट आहे. तापसी आणि अनुरागचा हा तिसरा प्रोजेक्ट आहे. ज्यामध्ये ते एकत्र काम करत आहेत. थप्पड या सिनेमात तापसी आणि पावेलच्या जोडीला चाहत्यांना खूप आवडली होती. आता दोबारा या चित्रपटाच्या माध्यमातून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 19 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


आगामी चित्रपटात शाहरूख बरोबर दिसणार तापसी 


तापसी पन्नूकडे आगामी अनेक चित्रपटाचे प्रोजेक्ट्स आहेत. तापसी शाहरूख खानबरोबर डंकी या चित्रपटातसुद्धा दिसणार आहे. तापसीने अधिकृतपणे सांगितले आहे की ती शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांच्या डंकी चित्रपटात काम करणार आहे. तापसी राजकुमार आणि शाहरुखसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. 


महत्वाच्या बातम्या :