KK's Daughter Taamara First Live Concert :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक केके (KK) अर्थात कृष्ण कुमार कुननाथ (Krishnakumar Kunnath) यांनी काही दिवसांपूर्वी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. 23 ऑगस्ट रोजी केके यांचा स्मृतिदिन होता. यानिमित्त केके यांची मुलगी तमारानं खास पद्धतीनं तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. तमारानं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये तमारानं तिच्या पहिल्या लाईव्ह कॉन्सर्टची माहिती दिली.


तमारानं शेअर केली खास पोस्ट
तमाराने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो तिच्या पहिल्या लाइव्ह कॉन्सर्टमधील आहेत. तमाराने या पोस्टद्वारे सांगितले आहे की, तिने पहिल्यांदा लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म  केलं आहे. यामध्ये प्रसिद्ध गायक शानने तिला साथ दिली. तमाराने  कॉन्सर्टमधील फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले , 'माझं पहिलं कॉन्सर्ट, हा एक चांगला अनुभव होता. सोबत असलेल्या सर्व महान कलाकारांचे आभार आणि शान अंकल यांचे विशेष आभार,  त्यांनी 'इट्स द टाइम टू डिस्को' हे गाणे गाण्यासाठी सपोर्ट केला. हे पाहून माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आले असेल. हे पाहण्यासाठी माझे वडील इथे असावेत, याचा मी विचार करत आहे. '


पाहा तमाराची पोस्ट: 






फादर्स-डेनिमित्त तमारानं शेअर केली होती पोस्ट:


'तुम्ही मला थोड्या वेळ भेटायला आला तर तुम्ही जाण्याचं दु:ख मी सहन करु शकते. तुमच्याशिवाय आयुष्य जगणं कठिण आहे. जगातील सर्वात क्युट आणि प्रेमळ वडील तुम्ही होता. तुम्ही नेहमी कॉन्सर्टवरुन घरी आल्यानंतर आम्हाला जवळ घेऊन बसत होता. मला तुमची खूप आठवण येते. तुमच्यासोबत जेवण करणं, तुमच्यासोबत हसणं, तुमचा हात पकडणं या सर्व गोष्टींची मला आठवण येते. या जगातील सर्वात बेस्ट वडिलांना फादर्स-डेच्या शुभेच्छा. मला माहित आहे तुम्ही आमच्यासोबत आहात. ' अशी पोस्ट तमारानं फादर्स-डेनिमित्त शेअर केली होती. 


'माचीस' चित्रपटातील गाण्यांमधून गायक केके यांना विशेष लोकप्रियता मिळाली. माचीस चित्रपटामधील छोड आये हम... या चित्रपटातील गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल चुके सनम' या चित्रपटामधील तडप तडप के... या केके यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. केके यांनी हिंदीसोबतच नऊ भाषांमधील गाणी रेकॉर्ड केली आहेत. 1999 मध्ये त्यांचा पल नावाचा त्यांचा पहिला अल्बम रिलीज केला. फिल्मफेयर अवार्ड देऊन देखील केके यांनी गौरवण्यात आलं. त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत होती.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: