KK Daughter Taamara :  प्रसिद्ध गायक केके (KK) यांचे  31 मे रोजी  निधन झाले. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केके बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध गायक होते. त्यांनी हिंदीमध्ये 200 हून अधिक गाणी गायली. Voice of Love अशी त्यांची ओळख होती.  पत्नी ज्योती लक्ष्मी कृष्णा आणि दोन मुलं असं केके यांचे कुटुंब आहे. केके यांच्या मुलीनं म्हणजेच तमारानं काल (19 मे) फादर्स-डे निमित्त एक भावनिक पोस्ट शेअर करुन वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


तमाराची पोस्ट
केके यांची मुलगी तमारा ही सिंगर आणि कंपोजर आहे.  'फादर्स-डे' निमित्त तिनं इन्स्टाग्रामवर केके यांच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'तुम्ही मला थोड्या वेळ भेटायला आला तर तुम्ही जाण्याचं दु:ख मी सहन करु शकते. तुमच्याशिवाय आयुष्य जगणं कठिण आहे. जगातील सर्वात क्युट आणि प्रेमळ वडील तुम्ही होता. तुम्ही नेहमी कॉन्सर्टवरुन घरी आल्यानंतर आम्हाला जवळ घेऊन बसत होता. मला तुमची खूप आठवण येते. तुमच्यासोबत जेवण करणं, तुमच्यासोबत हसणं, तुमचा हात पकडणं या सर्व गोष्टींची मला आठवण येते. या जगातील सर्वात बेस्ट वडिलांना फादर्स-डेच्या शुभेच्छा. मला माहित आहे तुम्ही आमच्यासोबत आहात. ' 






केके यांची गाणी 


'माचीस' चित्रपटातील गाण्यांमधून गायक केके यांना विशेष लोकप्रियता मिळाली. माचीस चित्रपटामधील छोड आये हम... या चित्रपटातील गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल चुके सनम'  या चित्रपटामधील तडप तडप के... या केके यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. केके यांनी हिंदीसोबतच नऊ भाषांमधील गाणी रेकॉर्ड केली आहेत. 1999 मध्ये त्यांचा पल नावाचा त्यांचा पहिला अल्बम रिलीज केला.  फिल्मफेयर अवार्ड देऊन देखील केके यांनी गौरवण्यात आलं.  त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत होती. 


संबंधित बातम्या