KK Daughter Post : प्रसिद्ध गायक केके (KK) यांचे 31 मे रोजी निधन झाले. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केके बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध गायक होते. त्यांनी हिंदीमध्ये 200 हून अधिक गाणी गायली. Voice of Love अशी त्यांची ओळख होती. पत्नी ज्योती लक्ष्मी कृष्णा आणि दोन मुलं असं केके यांचे कुटुंब आहे. केके यांच्या मुलीनं म्हणजेच तामरानं सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये केके यांच्या टीमला हेट मेसेज करणाऱ्यांना मेसेज दिला आहे. केके यांचे मॅनेजर हितेश भट आणि शुभम भट्ट यांना सोशल मीडियावर अनेक लोक हेट मेसेज करत आहेत. यावर एक पोस्ट शेअर करुन तामरानं केके यांच्या टीमला सपोर्ट केला आहे.
केके यांचा टीमसोबतचा फोटो शेअर करुन तामरानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'फोटोमधून माझ्या वडिलांसोबत असलेल्या व्यक्तींचे मी आभार मानते. हे सर्वजण माझ्या वडिलांसोबत ट्रॅव्हल करत होते.तसेच त्यांच्या शोमध्ये या लोकांची महत्त्वाची भूमिका होती. मी हितेश काका यांना सांगितलं की, नकुल आणि मी आमच्या वडिलांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत नव्हतो, त्यांना गुडबाय म्हणायची संधी आम्हाला मिळाली नाही. पण तुम्ही त्यांच्यासोबत होता.'
लोकांना दिला मेसेज
'मी असं ऐकलं आहे की, हितेश काका आणि शुभम यांना काही लोक हेट मेल आणि मेसेज करत आहेत. जे लोक हे हेट मेसेज करत आहेत, त्यांनी विचार करावा की, माझे वडील आज आपल्यासोबत असते तर त्यांना कसं वाटलं असतं? माझ्या वडिलांचे सर्व फॅन्स सपोर्ट करत आहेत. प्लिज मी सर्वांना विनंती करते की वाईट गोष्टी पसरवू नका. तुमची पाठिंबा त्यांना द्या. कारण सध्या त्यांना सपोर्टची गरज आहे.', असंही कॅप्शनमध्ये तामरानं लिहिलं.
तामारानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टला केके यांचे चाहते कमेंट्स आणि लाइक करत आहेत.
हेही वाचा:
KK Daughter Taamara : 'तुमची आठवण येते...'; 'केके' यांच्या मुलीनं शेअर केली भावनिक पोस्ट