Swatantrya Veer Savarkar : रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar) हा बहुप्रतीक्षित चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमासाठी रणदीपने प्रचंड मेहनत घेतली आहे. पण या चित्रपटाचा भाग असलेल्या प्रत्येकाने तेवढीच मेहनत, अभ्यास आणि रिर्सच केल्याचं समोर आलं आहे. ऐरोलीत राहणाऱ्या 24 वर्षीय मराठमोळ्या ऐश्वर्या बाचलने (Aishwarya Bachal) या सिनेमाचं सेट ड्रेसिंग केलं आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा तिचा पहिलाच बॉलिवूडपट आहे. पहिल्या बिग बजेट आणि एका वेगळ्या धाटणीच्या सिनेमासाठी ऐश्वर्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. या सिनेमाच्या प्रोसेसदरम्यान तिला अनेक गोष्टी शिकता आल्या आहेत. 


'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाबद्दल एबीपी माझाशी बोलताना ऐश्वर्या बाचल म्हणाली,"स्वातंत्र्यवीर सावरकर' हा नियतकालिक चित्रपट आहे. त्यामुळे या सिनेमासाठी रिसर्च खूप महत्त्वाचा होता. तसेच टीम वर्कमुळे हा सिनेमा शक्य झाला आहे. प्रोडक्शन डिझायनर निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा सिनेमा केला आहे. आर्ट डिरेक्टर सचिन पाटील, समिधा भोळे, प्रतीक बडगुजर या सर्वांनी मला मदत केली. शेवटपर्यंत आमचा या सिनेमावर रिसर्च सुरू होता. प्रत्येक गोष्टीचा रिफरेन्स रणदीप हुड्डा यांना हवा असायचा".



'स्वातंत्र्यवीर सावरकर'च्या शूटिंगदरम्यान रणदीप हुड्डा सरांनी रडवलंय : ऐश्वर्या बाचाल


'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाच्या शूटिंगबद्दल बोलताना ऐश्वर्या म्हणाली,"शूटिंगदरम्यान सेटवर खूप गोंधळ असायचा. रणदीप हुड्डा सेटवर यायचे तेव्हा त्यांच्या डोक्यात फक्त सावरकरांचा विचार सुरू असायचा. ते सेटवर आले की सावरकरच आले आहेत, असं सेटवरील सर्वांना वाटायचं. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये रणदीप हुड्डा यांचं लक्ष असायचं. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाचं शूटिंग प्रामुख्याने मुंबईत झालं आहे. या सिनेमात दाखवण्यात आलेली ट्रेन आम्ही सेटवरच बनवली आहे. रणदीप हुड्डा सरांनी सेटवर रडवलंदेखील आहे. त्यांना हवं तसं काम त्यांनी करुन घेतलं आहे. रणदीप हुड्डा आल्यावर सेटवर भीतीदायक वातावरण होतं. ते सेटवर आल्यावर त्यांना सावरकरांचं ऑफिस वाटलं पाहिजे, त्यांना सावरकरांचं घर वाटलं पाहिजे, याचा आमच्या डोक्याच विचार सुरू असायचा".


ऐश्वर्याला आर्ट डिरेक्शनची गोडी कशी निर्माण झाली? 


आर्ट डिरेक्शन हे करिअर निवडण्याबाबत ऐश्वर्या म्हणते,"कॉलेजमध्ये असताना एकांकिकांसाठी मी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होते. त्यावेळी सेटचं आकर्षण निर्माण झालं. कलेवरच्या प्रेमामुळे मी याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. पुढे गाणी, वेब फिल्म, लोढा मार्केटिंग अशा अनेक गोष्टींसाठी कामे केली. दरम्यान राकेश कदम यांच्यासोबत माझी ओळख झाली. 'पांडू', 'हर हर महादेव' असे चित्रपट केले.दरम्यान निलेश सरांनी माझं प्रोईल पाहिलं आणि विश्वास दाखवला. माझं कॉलेज किंवा शिक्षण आर्टमध्ये झालेलं नाही. पण कलेवरचं प्रेम पाहून त्यांनी मला या सिनेमासाठी विचारणा केली. आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगमी सिनेमावर लवकरच काम सुरू करणार आहे".


संबंधित बातम्या


Randeep Hooda : "सिनेमा बनवण्यासाठी घर विकलं, 30 किलो वजन कमी केलं"; 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना रणदीप हुड्डाचं सडेतोड उत्तर