Aishwarya Rai Bachchan Holika Dahan : होळी आणि धुळवडीच्या उत्सवाच्या रंगात सगळेजण रंगले आहेत. वाईट गोष्टींचे, प्रवृत्तींचे दहन व्हावे यासाठी होळीचे दहन केले जाते. सगळ्याच स्तरातील  लोकांनी जल्लोषात होळी साजरी केली. बॉलिवूडमधील दिग्गज कुटुंब असलेल्या बच्चन कुटुंबियांनीदेखील होलिका दहन (Holika Dahan) केले. यावेळी अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan), अभिषेक बच्चनदेखील (Abhishek Bachchan) उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा होती. मात्र, होलिका दहनच्या वेळी सगळं बच्चन कुटुंबीय एकत्रित दिसले. 


श्वेता नंदाची मुलगी आणि अभिषेक-ऐश्वर्याची भाची नव्या  नंदाने  इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत नव्याने होळीसमोर फोटो काढले. त्याशिवाय, मामा अभिषेक बच्चन आणि मामी ऐश्वर्या रायला गुलाल लावत त्यांचा आशिर्वाद घेतला.अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्यासह जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनीदेखील होलिका दहननिमित्त पूजा केली. 






युजर्स म्हणाले आनंद वाटला... 


नव्या नंदाने शेअर केलेल्या फोटोवर युजर्सने बच्चन कुटुंबिय एकत्र दिसल्याने आनंद वाटला असल्याचे म्हटले. काहींनी ऐश्वर्या आणि आराध्याही दिसत असल्याने आनंद व्यक्त केला. तर, काही युजर्सने होलिका दहनसाठी प्लायवूड वापरल्याबद्दल चिंता व्यक्त केली. प्लायवूडमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचा मुद्दा एकाने उपस्थित केला.