Swara Bhaskar Baby Girl: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  स्वरा भास्करच्या (Swara Bhaskar) घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. 23 सप्टेंबर रोजी  स्वराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.  स्वरा आणि तिचा पती फहाद अहमद (Fahad Ahmed) यांनी सोशल मीडियावर त्यांच्या मुलीचे काही फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करुन स्वरानं तिच्या मुलीच्या नावाबद्दल चाहत्यांना सांगितलं.  स्वरानं तिच्या मुलीचं खास नाव ठेवलं आहे. या नावाचा अर्थ काय आहे? जाणून घेऊयात...


स्वरा आणि तिचा पती फहाद अहमद यांनी त्यांच्या मुलीचे नाव "राबिया" असं ठेवले आहे. स्वराने तिच्या मुलीचे नाव एका सुफी संताच्या नावावरुन ठेवले आहे. राबिया बसरी या इराकमधील एक सुफी संत होत्या. त्या इराकमधील पहिल्या महिला सुफी संत होत्या. राबिया नावाचा अर्थ 'वसंत' असाही होतो.






स्वरानं राबियाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.  या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "प्रार्थना ऐकली गेली, आशीर्वाद देण्यात आला आणि एक गाणे गायले गेले. आमची मुलगी राबिया हिचा जन्म 23 सप्टेंबर 2023 रोजी झाला. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो." स्वरानं शेअर केलेल्या या फोटोला कमेंट्स करुन नेटकऱ्यांनी आणि काही सेलिब्रिटींनी स्वरा आणि फहादवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा


रिचा चढ्ढा, टिस्का चोप्रा,नीना गुप्ता, मोहम्मद झीशान अय्युब या सेलिब्रिटींनी स्वरानं शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन स्वरा आणि फहाद अहमद यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


काही दिवसांपूर्वी स्वराची बेबी शॉवर पार्टी देखील झाली होती.  स्वरानं तिच्या बेबी शॉवर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.






स्वराचे चित्रपट


विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधील स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता स्वराच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Swara Bhasker and Fahad Ahmad: स्वरा भास्कर आणि फहाद अहमद झाले आई-बाबा; अभिनेत्रीनं दिला मुलीला जन्म