Bollywood Movie Sequels Success : हिंदी मनोरंजनसृष्टी बहरली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक गाजलेल्या सिनेमांचे सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. यात 'गदर' (Gadar 2), 'ओएमजी 2' (OMG 2), 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2), 'एक था टायगर' (Ek Tha Tigher), केजीएफ (KGF), बाहुबली, सिंघम, दबंग, गोलमाल, हाऊसफुल्ल अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे.


सनी देओलच्या 'गदर 2'ची क्रेझ अजूनही कायम आहे. प्रेक्षक पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत. आतापर्यंत या सिनेमाने 177 कोटींची कमाई केली आहे. 'गदर' हा सिनेमा 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील तारा सिंह आणि सकीनाची जोडी प्रेक्षकांना आवडली. आता या सिनेमाचा दुसरा भागदेखील धमाकेदार कामगिरी करत आहेत. अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' आणि 'ड्रीम गर्ल 2' हे सिनेमेदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. एकंदरीतच कोणत्याही गाजलेल्या सिनेमाचा सीक्वेल प्रदर्शित झाला तर प्रेक्षक तो पाहायला जातातच. त्यामुळे या सिनेमांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होते. सध्या हेच बॉलिवूडच्या सिनेमांचं यशाचं मंत्र आहे.


'या' दहा सिनेमांचा सीक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीला


बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करायची असेल तर गाजलेल्या सिनेमांचा सीक्वेल बनवण्यावर निर्मात्यांचा भर आहे. आता 'पु्ष्पा : द रूल', 'सिंघम अगेन', 'टायगर 3','इंडियन 2','गोलमाल 5','फिर हेरा फेरी','वेलकम 3','हाऊसफुल्ल 4','यारियां 2','फुकरे 3' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 


सीक्वेलचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला


केजीएफ (KGF)
केजीएफ चॅप्टर 1 - 250 कोटी
केजीएफ चॅप्टर 2 - 1250 कोटी


बाहुबली (Baahubali)
बाहुबली - 500 कोटी
बाहुबली 2 - 1810 कोटी


सिंघम (Singham)
सिंघम - 157 कोटी
सिंघम रिटर्न - 219 कोटी
सिंबा - 400 कोटीट
सूर्यवंशी - 294 कोटी


दबंग (Dabangg)
दबंग - 221 कोटी
दबंग 2 - 255 कोटी
दबंग 3 - 230 कोटी


गोलमाल (Golmaal)
गोलमाल - 29.33 कोटी
गोलमाल रिटर्न - 51.12 कोटी
गोलमाल 3 - 106.34 कोटी
गोल माल अगेन - 205.69 कोटी


हाऊसफुल (Housefull)
हाऊसफु्ल - 75.62 कोटी
हाऊसफुल 2 - 106.00 कोटी
हाऊसफुल 3 - 109.14 कोटी
हाऊसफुल 4 - 194.60 कोटी


टीसीरिजच्या बॅनरअंतर्गत अनेक सिनेमांचे सीक्वेल सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. यात 'भूल भुलैया 3','आशिकी 3','धमाल 4','मेट्रो इन दिनों','दे दे प्यार दे 2','रेड 2'सारख्या अनेक सिनेमांचा समावेश आहे. फेंचाइजी असणारे सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी होत आहेत. सिनेप्रेमींना आता आगामी सिनेमांची उत्सुकता आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना आता मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात 14 दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. 


संबंधित बातम्या


October 2023 Release : ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; 14 सिनेमे होणार प्रदर्शित