Swanandi Tikekar Ashish Kulkarni Engagement : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) आणि 'इंडियन आयडॉल' (Indian Idol) फेम आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. त्यांच्या साखरपुड्याडे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


स्वानंदी आणि आशिषने तीन दिवसांपूर्वी दोघांचा एक रोमँटिक फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची कबुली दिली. त्यानंतर स्वानंदीने थेट साखरपुड्याच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. स्वानंदी आणि आशिषचे मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता स्वानंदी आणि आशिषचा थाटात साखरपुडा पार पडला आहे. 






सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव


स्वानंदी सोशल मीडियावर साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"अखेर आम्ही एंगेज झालो आहोत". स्वानंदी आणि आशिषच्या या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यशोमन आपटे, अमृता खानविलकर, नम्रता संभेराव, अभिषेक देशमुख, शिल्पा तुळसकर, शिवानी रांगोळे, श्रेया बुगडे, ऋतुजा बागवे, अशा अनेक सेलिब्रिटींनी स्वानंदी आणि आशिषला शुभेच्छा दिल्या आहेत. 


स्वानंदीचा थाटात साखरपुडा पार पडला आहे. चाहत्यांना आता लग्नाची उत्सुकता आहे. 'आमचं ठरलं', असं म्हणत स्वानंदी आणि आशिषने त्यांचं नातं जगजाहीर केलं. स्वानंदी कधी लग्न करणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. पण आता येत्या काही दिवसांत ती लोकप्रिय गायक 'इंडियन आयडॉल' फेम आशिष कुलकर्णीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.


स्वानंदी आणि आशिषबद्दल जाणून घ्या... (Swanandi Tikekar Ashish Kulkarni Projects)


स्वानंदी टिकेकर ही उदय टिकेकर (Uday Tikekar) आणि आरती अंकलिकर-टिकेकर (Aarati Ankalikar Tikekar) यांची लेक आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' (Dil Dosti Duniyadari) या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली आहे. तर 'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमाचीदेखील स्वानंदी विजेती होती. स्वानंदी अभिनेत्री असण्यासोबत गायिकादेखील आहे. तर आशिष कुलकर्णीने 'इंडियन आयडॉल 12' गाजवलं आहे. अनेक मराठी सिनेमांसाठी त्याने गाणी गायली आहेत.


संबंधित बातम्या


Swanandi Tikekar Engagement : मेहंदी है रचने वाली... स्वानंदी टिकेकरच्या हातावर रंगली साखरपुड्याची मेहंदी; पाहा फोटो