मुंबई : 'आप की अदालत' कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनबाबत गेलेल्या गौप्यस्फोटामुळे अभिनेत्री कंगना राणावत जोरदार चर्चेत आहे. कंगनाच्या आरोपांमुळे हृतिकच्या इमेजवर प्रश्न उपस्थित होत असताना, त्याची घटस्फोटित पत्नी सुझान खानने ट्विटरच्या माध्यमातून पाठराखण केली आहे.
ट्विटरवर सुझान खानने हृतिकसोबतचा फोटो शेअर करुन लिहिलं आहे की, "कोणत्याही आरोप आणि कटात एवढी ताकद नाही की एखाद्या चांगल्या आत्म्यावर विजय मिळवू शकेल."
https://twitter.com/sussannekroshan/status/904339430395310083
2014 मध्ये हृतिक आणि सुझान वेगळे झाले असले तरी ते अनेकदा एकत्र दिसतात. तिचं हे ट्वीट हेच सिद्ध करतं की दोघांमध्ये आता कोणतीही कटुता नाही.
दोघे आपल्या मुलांसह एकत्र सुट्टीसाठी जातात. मुलांचे वाढदिवसही एकत्र साजरा करतात. दोघे कधीही एकमेकांविषयी वाईट बोलताना दिसत नाहीत. कंगनाशी संबंधित वादांमध्ये सुरुवातीपासूनच सुझान हृतिकचा साथ देत आहे. आता पुन्हा एकदा कंगना आणि या वादाचा उल्लेख न करता हृतिकच्या पाठीशी उभी आहे.
सुझान आणि हृतिकच्या घटस्फोटाचं खरं कारण कधीही समोर आलं नाही तरी सुझानला हृतिकच्या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती होती, त्यामुळे ते वेगळे झाले, असं म्हटलं जातं. तर काही वृत्तानुसार, सुझानचं अभिनेता अर्जुन रामपालसोबत अफेअर असल्याने त्यांचा घटस्फोट झाला.
कंगनाच्या आरोपांनंतर सुझानचं हृतिकच्या समर्थनार्थ ट्वीट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Sep 2017 12:41 PM (IST)
2014 मध्ये हृतिक आणि सुझान वेगळे झाले असले तरी ते अनेकदा एकत्र दिसतात. तिचं हे ट्वीट हेच सिद्ध करतं की दोघांमध्ये आता कोणतीही कटुता नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -