मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडीचा बादशाह सुनील ग्रोवरला डेंग्यूची लागण झाली आहे. मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये सुनील ग्रोवरवर उपचार सुरु आहेत.
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, सुनील ग्रोवरला गेल्या तीन दिवसांपासून ताप होता. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली गेली, त्यावेळी त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झालं. गुरुवारी (31 ऑगस्ट) सुनील ग्रोवरला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
आपल्या अफलातून कॉमेडीमुळे अभिनेता सुनील ग्रोवर सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘डॉ. मशहूर गुलाटी’ आणि ‘रिंकू भाभी’च्या भूमिका सुनीलमुळे लोकप्रिय झाल्यात. याआधी ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’मधील ‘गुत्थी’च्या भूमिकेवरही प्रेक्षकांनीही प्रचंड प्रेम केलं.
अभिनेता सुनील ग्रोवरला डेंग्यूची लागण, मुंबईत उपचार सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Sep 2017 08:47 AM (IST)
सुनील ग्रोवरला गेल्या तीन दिवसांपासून ताप होता. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली गेली, त्यावेळी त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झालं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -