एक्स्प्लोर

सिद्धार्थ पिठानीची अंतिम साक्ष 4 ऑक्टोबरला; सुशांत सिंह प्रकरणाला 302 कलम लावण्याचा सीबीआयचा विचार

सिद्धार्थ दिल्लीत पोहोचला आहे. सीबीआयची टीम, जी सुशांत मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्लीत आली होती तीही आता दिल्लीत पोचली आहे. आता दिल्लीत सिद्धार्थ पिठानीची साक्ष होणार आहे.

मुंबई : सिद्धार्थ पिठानी हा सुशांत मृत्यू प्रकरणातील अत्यंत महत्वाचा साक्षीदार आहे. कारण, तो सुशांतचा मित्र होता. तो त्याच्याच सोबत रहात होता. सुशांतचा मृत्यू ज्या दिवशी झाला त्या दिवशी सिद्धार्थ वांद्र्यातील त्याच फ्लॅटवर होता. पण असं असताना सिद्धार्थ सातत्याने आपले जबाब बदलताना दिसतो आहे. आता मात्र त्याचा अंतिम जबाब घेण्याची वेळ सीबीआयने निश्चित केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआय इतरांचे जबाब घेत असताना सिद्धार्थ पिठानी मात्र गायब झाला होता. आधी वेगवेगळ्या माध्यमातून रियाची पाठराखण करणारा सिद्धार्थ अचानक बोलायचा बंद झाला. तो मुंबईत नसल्याच्या बातम्याही आल्या. पण आता आलेल्या माहीतीनुसार, सिद्धार्थ दिल्लीत पोहोचला आहे. सीबीआयची टीम, जी सुशांत मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्लीत आली होती तीही आता दिल्लीत पोचली आहे. आता दिल्लीत सिद्धार्थ पिठानीची साक्ष होणार आहे. सिद्धार्थ वारंवार आपला जबाब बदलतोय हे लक्षात घेऊन आता शेवटची होणारी त्याची साक्ष ही कलम 164 नुसार होणार आहे. म्हणजे, आता दिलेली साक्ष त्याला बदलता येणार नाही. काही साक्षीदारांच्या उपस्थितीत ही साक्ष लिहून घेतली जाणार आहे. सिद्धार्थ पिठानी सुशांत प्रकरणातला महत्वाचा साक्षीदार आहे. कारण, सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या बेडरुमचा दरवाजा उघडताना सिद्धार्थ पिठानी होता. सुशांतचा लटवकवलेल्या अवस्थेतला मृतदेह आपणच खाली काढला असं सिद्धार्थ सांगतो. पण सहा फूट उंचीचा आणि 80 किलो वजनाचा धडधाकट शरीर एकटा माणूस खाली कसा काढेल अशाही शंका घेतल्या जातायत. आता त्यात रिया आणि सुशांत भेटल्याचाही मुद्दा आला आहे. मग रिया आणि सुशांत यांच्यादरम्यान समन्वयक म्हणून कुणी काम केलं तेही आता तपासून पाहिलं जाणार आहे. सिद्धार्थने आपल्या जबाबात सुशांत आपल्या रुममध्ये मध्यरात्री 1 वाजता येऊन गेल्याचं तो सांगतो. पण दुसरीकडे रियाला सोडायला सुशांत पहाटे दोन वाजता तिच्या घरासमोर असल्याचंही प्रत्यक्षदर्शी सांगतो. त्यामुळे आता सिद्धार्थ पिठानीच्या साक्षीला कमालीचं महत्वं आलं आहे. दुसरीकडे सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात तपासले गेलेले पुरावे, साक्षी आणि आलेले अहवाल पाहता सुशांत प्रकरणाला 302 कलम लावण्याचा विचार सीबीआय करते आहे. हे कलम लागलं तर गु्न्हेगारांना 302 नुसार शिक्षा होऊ शकते. आलेले फॉरेन्सिक रिपोर्टही सुशांतचा मृत्यू होमीसाईड असू शकते असं सांगतो. त्यामुळे त्याबाबत काय करावं याचा विचार सध्या सीबीआय करत आहे. या सर्व घडामोडींसाठी 4 तारीख अत्यंत महत्वाची आहे. एकिकडे हा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. दुसरीकडे सीबीआयची टीम आता दिल्लीत गेली आहे. तिथेही काही साक्षी अत्यंत गोपनीय पद्धतीने चालू आहेत. यानंतर सीबीआय या तपासातून काय निष्पन्न होतं ते पाहाणं कुतूहलाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Embed widget