Sushant Singh Rajput : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला आज तीन वर्ष झाली आहेत. 21 जानेवारी 1998 रोजी जन्मलेला सुशांत 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. त्यावेळी त्याने आत्महत्या केल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. पण आजही हत्या की आत्महत्या हे सुशांतच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. सुशांत सिंह राजपूतला अल्वावधीतच चांगलीच लोकप्रियता मिळाली असली तरी त्याच्या काही इच्छा आणि स्वप्न मात्र अपूर्णच राहिले आहेत. आज त्याच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या सुशांत सिंह राजपूतच्या अपूर्ण इच्छा आणि स्वप्नांबद्दल...

Continues below advertisement

सुशांत सिंह राजपूतच्या 'या' 20 इच्छा राहिल्या अपूर्ण 

1. वैमानिक होण्याची सुशांत सिंह राजपूतची इच्छा होती. 

2. आरर्नमॅन ट्रायनलॉनची तयारी करायची होती. 

Continues below advertisement

3. डाव्या हाताने क्रिकेट खेळायचं होतं. 

4. सुशांतला मोर्स कोड शिकायचं होतं. 

5.  मुलांना स्पेसबद्दल माहिती द्यायची होती. 

6. टेनिसच्या चॅम्पियनसोबत सामना खेळायचा होता. 

7. फोर क्लॅप पुशअप्स करण्याची सुशांतची इच्छा होती. 

8. डबल स्लिटचा प्रयोग करण्याची सुशांतची इच्छा होती. 

9. हजारो रोपटं लावण्याची सुशांतची इच्छा होती. 

10. दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये एक रात्र घालवावी अशी सुशांतची इच्छा होती. 

11. कैलास पर्वतावर जाऊन सुशांतला ध्यानाला बसायचं होतं. 

12. सुशांतला एक पुस्तकदेखील लिहायचं होतं. 

13. डिज्नीलॅन्ड पाहण्याची सुशांतची इच्छा होती. 

14. एका घोड्याचा सांभाळ करण्याची सुशांतची इच्छा होती. 

15. खेड्यात जाऊन शेती करायची सुशांतची इच्छा होती.

16. स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यावर भाष्य करणारी माहितीपट बनवण्याची सुशांतची इच्छा होती. 

17. आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर काम करण्याची इच्छा सुशांतने व्यक्त केली होती. 

18. ब्राझीलचा डान्स आणि मार्शल आर्ट शिकण्याचं सुशांतचं स्वप्न होतं. 

19. ट्रेनमधून परदेशात जाण्याचंदेखील सुशांतचं स्वप्न होतं. 

20. 100 मुलांना नासामधील वर्कशॉपचं ट्रेनिंग देण्याचं सुशांतचं स्वप्न होतं. 

सुशांतचा सिंह राजपूतच्या फिल्मी प्रवास... 

सुशांत सिंह राजपूत अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला. एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. पहिल्याच मालिकेच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला. या मालिकेत तो अंकिता लोखंडेसोबत स्क्रिन शेअर करताना दिसला होता. सुशांतचा 'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमा चांगलाच गाजला. हा सिनेमा क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीच्या आयुष्यावर आधारित होता. केदारनाथ, सोनचिडिया, छिछोरे, दिल बेचारा असे त्याचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. 

संबंधित बातम्या

Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतचे हे सिनेमे पाहिलेत का?