एक्स्प्लोर
ती अल्कोहोलिक नाही, ब्रेकअपच्या घोषणेवेळी सुशांतचं स्पष्टीकरण
मुंबई : बॉलिवूडमधला नवोदित अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि टीव्ही मालिकांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांमध्ये दुरावा आल्याच्या अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर अखेर सुशांतने आज
ट्विटरवरुन याबाबत जाहीर केलं आहे.
सुशांतच्या आयुष्यात अंकिता व्यतिरिक्त अन्य स्त्री आल्याच्या चर्चेपासून अंकिता इन्सिक्युअर आहे आणि मद्याच्या आहारी गेली असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर सुशांत सिंग राजपूतने ट्विटरवरुन आपल्या नात्याबाबत खुलासा केला. मी महिलांच्या आयुष्याशी
खेळणारा कॅसनोव्हा नाही, अंकिताही अल्कोहोलिक नाही, असं स्पष्टीकरण त्याने दिलं आहे. दोन माणसं विभक्त होतात, ही दुर्दैवी गोष्ट आहे. काळ त्यावर औषध आहे, अशा आशयाचं ट्वीट त्याने केलं आहे.
https://twitter.com/itsSSR/status/727862716912799745
यापूर्वीही सुशांतने अनेकदा रिलेशनशीप स्टेटसबाबत ट्वीट केले होते, ज्यातून वेगवेगळे अर्थ काढण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र सुशांतच्या स्पष्टीकरणानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
सुशांत आगामी 'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात दिसणार आहे, तर अंकिताही बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी दिग्दर्शकांशी बातचित करत असल्याचं म्हटलं जातं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement