एक्स्प्लोर
अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा नवा 'घरोबा'
मुंबई : अंकिता लोखंडेसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर अभिनेता सुशांत सिंग राजपूत पुन्हा आपलं बॅचलर लाईफ एन्जॉय करताना दिसत आहे. स्वतःच्या हौस-मौज पुऱ्या करण्याचा एक भाग म्हणजे त्याने एक मोठा फ्लॅट विकत घेतला आहे. मुंबईत वांद्र्याच्या हिल रोडवर लिटल हाईट्स बिल्डिंगमध्ये सुशांतने हे लॅव्हिश अपार्टमेंट खरेदी केलं आहे.
सुशांत सध्या एकटाच या घरात राहत असल्याची माहिती आहे. त्याच्या घराचा नेमका एरिया आणि किंमत किती, याबाबत नेमकी माहिती नसली तरी तो प्रशस्त आणि आरामदायी असल्याचं म्हटलं जातं. या फ्लॅटची किंमत काही कोटींच्या घरात असल्याचाही अंदाज आहे. सुशांतने नुकतंच आपल्या जवळच्या मित्रांना या घरात मोठी पार्टीही दिली होती.
सुशांतची एक्स-गर्लफ्रेण्ड अंकिता लोखंडेला या पार्टीचं आमंत्रण नव्हतं, मात्र अभिनेत्री क्रिती सॅनॉन या पार्टीला उपस्थित होती. क्रितीसोबत सुशांतचं नाव जोडलं जात होतं. परंतु तिनेही आम्हा दोघांत असं कुठलंही नातं नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement