Aishwarya Narkar Avinash Narkar Lovestory : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अविनाश नारकर (Avinash Narkar) या जोडीने मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. प्रेक्षकांची ही आवडती जोडी आहे. गेल्या काही दिवसांपासून रिल्समुळे ते चर्चेत आहेत. त्यांचे रिल्स व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे चाहत्यांना आता त्यांची लव्हस्टोरी जाणून घेण्याची उत्सुकता आहे.


अविनाश नारकर हे मुंबईकर असून त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तर दुसरीकडे ऐश्वर्या नारकर यांचं लग्नाआधीचं नाव पल्लवी आठल्ये. डोंबिवलीत राहणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांना शालेय शिक्षणादरम्यानच आयुष्यातलं पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं. 'गंध निशिगंधाचा' या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. या नाटकादरम्यानच अविनाश नारकरांसोबत त्यांची ओळख झाली.




'गंध निशिगंधाचा' या नाटकात अविनाश नारकर आणि पल्लवी एकत्र काम करायचे. पण ऐश्वर्या यांना अविनाश आपल्यापेक्षा वयाने मोठे वाटत असल्याने त्या त्यांच्यासोबत जास्च बोलायच्या नाहीत. तर दुसरीकडे अविनाश यांना मात्र तेव्हाची पल्लवी पहिल्या भेटीतच आवडली होती. त्यावेळीही अविनाश नारकर लोकप्रिय होते. मालिकांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असे.  'गंध निशिगंधाचा' या नाटकाचे दौरेही होत असे. 


'गंध निशिगंधाचा' या नाटकाचा दौरा संपल्यानंतर अविनाश नाकर यांनी ऐश्वर्या नारकर यांना प्रपोज केलं होतं. पल्लवीला काय वाटेल, ती काय विचार करेल या गोष्टींचा विचार न करता त्यांनी आपल्या मनातील भावना पल्लवीला सांगितल्या. पुढे ऐश्वर्या नारकर यांनीदेखील त्यांना आपला होकार कळवला. त्यानंतर लगेचच अविनाश नारकर पल्लवीच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी गेले. 


अन्...ऐश्वर्या-अविनाश अडकले लग्नबंधनात


अविनाश नारकर हे नोकरी करत नाटक, सिनेमांत काम करत होते. मुलागा चांगल्या घरातला आहे हे पाहून त्यांनी लगेचच लग्नासाठी आपला होकार कळवला. 3 डिसेंबर 1995 रोजी ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघांनीही मनोरंजनसृष्टीत काम करणं सुरू ठेवलं. अमेय नारकर असं त्यांच्या मुलाचं नाव आहे.  ऐश्वर्या आणि अविनाश सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियावर ते एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. मराठी इंडस्ट्रीतील गोड जोडी अशी ऐश्वर्या-अविनाश यांची ओळख आहे.


संबंधित बातम्या


Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"