Jai Bhim : दाक्षिणात्य अभिनेता 'सूर्या'च्या (Suriya) 'जय भीम' सिनेमाचे प्रचंड कौतुक झाले होते. आता या सिनेमाने आणखी एक नवा विक्रम केला आहे. ज्या सिनेमांनी ऑस्करसाठी एन्ट्री पाठवली आहे त्यांना यूट्यूब चॅनलचे तिकीट खरेदी करता येते. 3,72,000 रुपये भरून ऑस्करच्या यूट्यूब चॅनलवर 20 मिनिंटांपर्यंतची चित्रपटातील दृश्ये प्रदर्शित करण्यासाठी तिकीट मिळते. 'जय भीम'च्या निर्मात्यांनी हे तिकीट खरेदी केल्यामुळे सूर्याच्या चाहत्यांना 'जय भीम' सिनेमाची काही दृश्ये यूट्यूबवर पाहता येणार आहेत. काही दिवसांपूर्वी  IMDb ने 2021 मधील लोकप्रिय ठरलेल्या सिनेमांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये जय भीम  (Jai Bhim) या चित्रपटाने पहिला क्रमांक पटकवला होता.  





'जय भीम' या चित्रपटामध्ये  दाक्षिणात्य अभिनेता सूर्याने (Suriya) प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच  या चित्रपटात प्रकाश राज, मनिकंदन, गुरू सोमसुंदरम, अभिनेत्री लिजो मोल जोस, राजिशा विजयन या कलाकारांनी महत्तवपूर्ण भूमिका साकारली आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि चित्रपटाच्या कथेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.



1995 सालातल्या सत्य घटनेवर सिनेमा
जय भीम सिनेमा हा प्रादेशिक सिनेमा आहे. तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या 1995 सालातल्या सत्य घटनेवर हा सिनेमा बेतलाय. रखडलेल्या खून, दरोडा, चोरीच्या केसेस पूर्ण करण्यासाठी थेट आदिवासींना उचलायचं, पोलीस कोठडीत त्यांना मार मार मारायचं, इतकं मारायचं की ते न केलेला गुन्हाही मान्य करतील. या वंचित लोकांसाठी लढणाऱ्या एका वकिलाची कथा सिनेमात दाखवली आहे. 


संबंधित बातम्या


OTT Release Of The Week: भौकाल-2 ते द रॉयल ट्रिटमेंट ; या आठवड्यात प्रदर्शित होणार धमाकेदार वेब सीरिज आणि चित्रपट


Netflix : नेटफ्लिक्सच्या 'या' वेब सीरिजची प्रेक्षकांमध्ये चर्चा; पाहा यादी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha