OTT Web Series Release : या आठड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यामधील काही चित्रपट आणि वेब सीरिजची वाट प्रेक्षक उत्सुकतेनं पाहात आहेत. द रॉयल ट्रिटमेंट (The Royal Treatment),अनपॉज्ड- नया सफर (Unpaused Naya Safar), ओजार्क सिझन 4 (Ozark Season 4), भौकाल-2 (Bhaukaal New Season), 36 फार्महाउस (36 Farm House) हे चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
द रॉयल ट्रिटमेंट (The Royal Treatment)
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर द रॉयल ट्रिटमेंट 20 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. द रॉयल ट्रिटमेंटचा ट्रेलर प्रदर्शित झाल्या पासूनच प्रेक्षक याची वाट उत्सुकतेने पाहात आहेत.
अनपॉज्ड- नया सफर (Unpaused Naya Safar)
अनपॉज्ड- नया सफर या सीरिजमध्ये पाच शॉर्ट फिल्म आहेत. 21 जानेवारी रोजी ही सीरिज अॅमेझॉन प्राइमवर 240 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ओजार्क सिझन 4 (Ozark Season 4)
क्राइम ड्रामा सीरिज ओजार्क सिझन 4 (Ozark Season 4) ला दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचा पहिला पार्ट 21 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
भौकाल सिझन-2 (Bhaukaal New Season)
भौकाल सिझन-2 (Bhaukaal Season 2) 20 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये अभिनेता मोहित रैनानं महत्वाची भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये त्यानं एसपी सिकेरा ही भूमिका साकारली आहे. भौकालच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.
36 फार्महाउस (36 Farm House)
झी-5 या अॅपवर 21 जानेवारी रोजी 36 फार्महाउस हा चित्रपट 21 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे कथानक हे एका कुटुंबावर आधारित असणार आहे.
संबंधित बातम्या
- 'पुष्पा'नंतर आता अल्लू अर्जुनची चाहत्यांना आणखी एक भेट; यावर्षी 'हा' चित्रपट होणार रिलीज
- Actress Childhood Photo : 'या' क्यूट मुलीला ओळखलं? सध्या आहे बॉलिवूडची 'एंटरटेन्मेंट क्विन'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha