Suriya to Become Karna : दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या (Suriya) सध्या त्याच्या आगामी 'कंगुवा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. तामिळ सुपरस्टार सूर्याच्या या सिनेमांचं दिग्दर्शन शिवा करत आहे. सूर्याचा हा पहिलाच पॅन इंडिया सिनेमा आहे. आता 'कर्ण' (Karna) या सिनेमीच्या माध्यमातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.


बॉलिवूड गाजवण्यासाठी सूर्या आता सज्ज आहे. 'जय भीम' स्टार सूर्या लवकरच 'रंग दे बसंती' फेम दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहराच्या आगामी सिनेमात सूर्या दिसणार आहे. सूर्याच्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड सिनेमाचं नाव 'कर्ण' आहे. कर्णच्या पात्राभोवती फिरणारा हा सिनेमा आहे. 'कर्ण' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा एक पौराणिक कथा पाहायला मिळणार आहे. 


500 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती होणार


'कर्ण' या सिनेमात सूर्या कर्णच्या भूमिकेत दिसणार आहे. हा बिग बजेट सिनेमा असणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. पुढील वर्षात अर्थात 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. 'वादी वासाल' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सूर्या 'कर्ण' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुधा कोंगरा या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.  






दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार 'कर्ण'


'कर्ण' हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अद्याप या सिनेमाची स्टारकास्ट समोर आलेली नाही. सूर्याच्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'कर्ण' हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा असणार आहे. त्यामुळे सूर्याच्या चाहत्यांसह सिनेप्रेमी या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


सूर्याच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Suriya Movies)


सूर्याचा 'कंगुवा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमासह तो 'वादी वासाल' आणि 'कर्ण' या सिनेमात झळकणार आहे. तसेच अक्षय कुमारच्या 'सोराराई पोट्टरू'च्या रिमेकमध्येही तो दिसणार आहे. या सिनेमात त्याची झळक दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. सूर्याच्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सूर्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवली आहे. आता बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण करण्यासाठी तो सज्ज आहे.


संबंधित बातम्या


Suriya : चाहत्याचा अपघातात मृत्यू झाल्याचं कळताच कुटुंबाला धीर द्यायला गेला सुपरस्टार सूर्या; फोटो व्हायरल