Sunny Leone : 'कन्नी' (Kanni) या सिनेमाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. सिनेमाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी अनेकांना वेड लावलं आहे. प्रत्येक गाण्याचा जॉनर वेगळा असून सगळ्याच गाण्यांवर संगीतप्रेमी प्रेम करत आहेत. यातील विशेष गाजलेले गाणे म्हणजे 'नवरोबा' (Navroba). 'कन्नी' या सिनेमातील 'नवरोबा' गाण्याची सनी लिओनीला भुरळ पडली आहे. या गाण्यावर डान्स करतानाचा अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


सनी लिओनीला 'नवरोबा'ची भुरळ


'नवरोबा' या गाण्यावरील अनेक रील्स सध्या व्हायरल होत आहेत. यातील हूकस्टेपही प्रचंड गाजत आहेत    आणि याचीच भुरळ बॉलिवूडच्या सनी लिओनीला पडली आहे. 'नवरोबा' गाण्यावरील सनीचे हे नृत्य सोशल मीडियावर प्रचंड गाजतेय. सनी हे गाणे एन्जॉय करतेय,असे एकंदर तिच्या चेहऱ्यावरून दिसतेय. 






'नवरोबा'ची चाहत्यांना उत्सुकता!


'नवरोबा' या गाण्यात मित्रांमध्ये असतानाही हृताची नजर तिच्या आयुष्यात येणाऱ्या 'नवरोबा'च्या शोधात दिसत आहे. फार आतुरतेने ती तिच्या आयुष्यात येणाऱ्या नवऱ्याची वाट पाहात असून संपर्कात येणाऱ्या प्रत्येक मुलात ती 'नवरोबा' शोधतेय. हृताचा हा 'नवरोबा' शोध संपणार का, याचे उत्तर प्रेक्षकांना सिनेमा पाहताना मिळेल. 


समीर जोशी (Sameer Joshi) लिखित-दिग्दर्शित ‘कन्नी’हा सिनेमा 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात हृता दुर्गुळे (Hruta Durgule), अजिंक्य राऊत (Ajinkya Ranut), शुभंकर तावडे (Shubhankar Tawde), वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची निर्मिती अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी यांनी केली आहे.


'कन्नी'मध्ये काय पाहायला मिळेल?


मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना एकत्र बांधून ठेवणारा सिनेमा म्हणजे ‘कन्नी’. कन्नी या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हृताचे परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न आहे, मात्र यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. आता या अडचणीतून हृता कशी बाहेर पडणार, तिला तिचा नवरोबा मिळणार आणि यात तिला तिचे मित्र साथ देणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सिनेमा पाहिल्यावर मिळणार आहेत. 


'कन्नी' चित्रपटाबद्दल दिग्दर्शक म्हणतात,"नाते हे आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाचे आहे. मग ते मैत्रीचे असो वा प्रेमाचे. ही नातीच आपल्यासोबत शेवटपर्यंत असतात. ‘कन्नी’मध्ये हेच पाहायला मिळणार आहे. मैत्री, प्रेम आणि स्वप्नांचा मागोवा घेणारी ‘कन्नी’ प्रेक्षकांना आवडेल. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो कुटुंबासोबत एन्जॅाय करावा".


संबंधित बातम्या


Kanni : टाळ्या, शिट्यांच्या जल्लोषात हृता दुर्गुळेच्या 'कन्नी'चा ट्रेलर आऊट! 'या' दिवशी सिनेमा होणार रिलीज