Gadar 2 : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या चर्चेत आहे. लवकरच त्याचा  'गदर 2' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 2001 साली प्रदर्शित झालेल्या सनी देओलच्या 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. 
सनी आणि अनिल शर्माने चित्रपटाच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त 'गदर' चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली. त्यामुळे चाहते आता 'गदर 2' सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


सनी देओलने सोशल मीडियावर 'गदर 2' मधील तारा सिंहचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे,"केवळ काही नशीबवान लोकांनाच अप्रतिम पात्रांना  पुन्हा जिवंत करण्याची संधी मिळते. तारा सिंह 20 वर्षांनंतर हजर आहे". तारा सिंहने पुढे लिहिले आहे, "तारा सिंहचे पहिले शेड्युल पूर्ण झाले आहे. मला खूप छान वाटत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे. पोस्टबद्दल सांगायचे तर, निर्मात्यांनी सनी देओलला 20 वर्षांपूर्वी तारा सिंहसारखा दिसण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही".






सनी देओलने शेअर केलेल्या फोटोत तारा सिंह दयाळू दिसतो आहे. सनीने फोटो शेअर करताच त्याचा हा लूक काही वेळातच व्हायरल झाला. चाहत्यांमध्ये सिनेमाची उत्सुकता दिसते आहे. सनीच्या लूकवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव होत आहे. गदर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 133 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे गदर-2 चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 


संबंधित बातम्या


Gadar 2 : तारा सिंह आणि सकिनाची जोडी पुन्हा येतेय, शूटिंगचे फोटो व्हायरल


Kareena Kapoor Covid Negative : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर कोरोनामुक्त


Radhe Shyam Trailer : Prabhas च्या आगामी 'राधे श्याम'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, हिंदी भाषेतदेखील होणार प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha