Sher Shivraj : फर्जंद, फत्तेशिकस्तच्या यशस्वी घोडदौडनंतर दिग्पाल लांजेकर आता 'पावनखिंड' सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच त्यांनी त्यांच्या आगामी 'शेर शिवराज' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. हा सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा दिग्पाल लांजेकरांनीच सांभाळली आहे. 


सिनेमाचे पोस्टर शेअर करत दिग्पाल लांजेकरांनी लिहिले आहे,"आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडला. सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह...शेर शिवराज...29 एप्रिल 2022...हर हर महादेव". या सिनेमाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. चाहते कमेंट्स करत आहेत,"पावनखिंड पाठोपाठ अजून एक सुखद धक्का. उत्कंठा शिगेला. जय शिवराय." 


अनेक मराठी कलाकारदेखील या सिनेमासाठी उत्सुक आहेत. नवीन चंद्रा, नितीन केणी, प्रद्योत पेंढरकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकरांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. पोस्टरमध्ये रक्ताने माखलेला हात दिसतो आहे. सिनेमात कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.





31 डिसेंबरला प्रदर्शित होणार 'पावनखिंड'
31 डिसेंबरला स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा पावनखिंड सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सिनेमात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पहायला मिळणार आहे. तसेच मराठी कलाकारांचा भलामोठा फौजफाटा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं 'पावनखिंड' नाव पडलं. प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा ऐतिहासिक सिनेमाचा अनुभव घेता येणार आहे. 


संबंधित बातम्या


Sarsenapati Hambirrao : प्रविण तरडेंच्या 'सरसेनापती हंबीरराव'ची 'बाहुबली'ला उत्सुकता; प्रभासने केला टीझर शेअर


Radhe Shyam Trailer : Prabhas च्या आगामी 'राधे श्याम'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, हिंदी भाषेतदेखील होणार प्रदर्शित


The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स' मध्ये चिन्मय मांडलेकर साकारणार महत्वाची भूमिका; पाहा मोशन पोस्टर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha