Sunny Deol On Bollywood Hindi Movies : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचून आणण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला आहे. दरम्यान हिंदी सिनेमांना बॉलिवूड म्हणू नका, असं वक्तव्य सनी देओलने केलं आहे.


'गदर 2'च्या यशानंतर एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान सनी देओलने 'बॉलिवूड' या शब्दावर नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला,"आम्ही हिंदी सिनेमे बनवतो आणि याचा आम्हाला अभिमान असायला हवा. हॉलिवूडसारखं आपल्यालाही हॉलिवूड बोलणं गरजेचं नाही. ही हिंदी-सिनेसृष्टी आहे...हिंदी सिनेमा आहे. हिंदुस्तान जिंदाबाद आहे आणि राहिल". 


सनी देओल पुढे म्हणाला,"आपल्या देशात सिनेमांना घेऊन भेदभाव केला जातो. या सिनेमांना 'मासी फिल्म्स' म्हणजेच जनसमुहवाले सिनेमे म्हटले जाते. मासी म्हणजे सार्वजनिक. आपण जनतेला का कमी लेखत आहोत? जनतेपासून स्वत:ला वेगळं करण्याची आपली मानसिकता नाही. भारत म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. आपल्या देशात खूप कला आणि संस्कृती आहे. आपल्या कला आणि संस्कृतीचा अभिमान बाळगण्याऐवजी आपण पाश्चिमात्य देशांची नक्कल करत आहोत".


सनी देओल म्हणाला,"आपल्या देशातील कलेचा आणि संस्कृतीचा अभिमान वाटेल अशा कलाकृतींची निर्मिती व्हायला हवी. आपण स्वत:ची कॉपी केली पाहिजे... इतर देशांची नव्हे. सर्वांनाच माहिती आहे की, माझे वडील आणि आमचं कुटुंब आमच्या मुळाशी आणि संस्कृतीशी जोडलं गेलं आहे. आजच्या तरुणांना भावतील असे सिनेमे आम्ही करू". 


सिनेप्रेमींमध्ये 'गदर 2'ची क्रेझ


सनी देओलचा 'गदर 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पाच दिवसांत भारतात या सिनेमाने 228.58 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात 230 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'गदर 2' हा 2001 मध्ये आलेल्या 'गदर : एक प्रेम कथा' या सिनेमाचा सीक्वेल आहे. 22 वर्षांनंतरही चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कायम आहे. तारा आणि सकिनाच्या जोडीवर प्रेक्षक तेवढच प्रेम करत आहेत. कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत 'गदर 2' या सिनेमाचा समावेश झाला आहे.






संबंधित बातम्या


Movies : रजनीकांत हिट.. बॉलिवूड सुखावलं...मराठी मनोरंजनसृष्टीही बहरली; स्वातंत्र्यदिनी आणि काय हवं?