Bollywood Marathi South Movies Independence Day 2023 : देशात आज 77 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2023) साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा 'जेलर' (Jailer), सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2), अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' (OMG 2) आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) असे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षक आज पाहू शकतात. 


जेलर (Jailer) : दाक्षिणात्य सुपरस्टारचा 'जेलर' हा सिनेमा 10 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून रिलीजच्या पाच दिवसांत या सिनेमाने भारतात 189 कोटींची कमाई केली असून जगभरात 308 कोटींचा गल्ला जमवला आहे. थलायवा रजनीकांतच्या या सिनेमाची जगभरातील सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे.


गदर 2 (Gadar 2) : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'गदर: एक प्रेम कथा' या सिनेमाचा सीक्वेल पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात चांगलीच गर्दी करत आहेत. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 172 कोटींची कमाई केली आहे. आज हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


ओएमजी 2 (OMG 2) : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी यांचा 'ओएमजी 2' (OMG 2) हा सिनेमाही सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. लैंगिक शिक्षणावर भाष्य करणाऱ्या या सिनेमाचं कथानक आणि कलाकारांच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. या सिनेमानेदेखील रिलीजच्या चार दिवसांत 54 कोटींची कमाई केली आहे. 


बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) : दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेमांसह मराठी मनोरंजनसृष्टीही बहरली आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा 100 कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पुन्हा-पुन्हा हा सिनेमा पाहावा यासाठी निर्मात्यांनी या सिनेमाच्या तिकीटाची किंमत फक्त 100 रुपये ठेवली आहे. 


पब्लिक खूश हुआ...


मोठ्या विकेंडचा फायदा सिने-निर्मात्यांना झाला आहे. तसेच विविध विषयांवर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळत असल्याने प्रेक्षकदेखील सुखावले आहेत. 'जेलर',गदर 2, ओएमजी 2, बाईपण भारी देवा हे सिनेमे प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळवण्यात यशस्वी ठरले आहेत. 'पठाण'नंतर सर्वाधिक कमाई करणारा 'गदर 2' हा सिनेमा ठरला आहे. आज या सर्व सिनेमांच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होईल.


संंबंधित बातम्या


Box Office : थिएटरमधल्या गर्दीने 100 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; तीन दिवसांत दोन कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिला 'जेलर','गदर 2' अन् 'OMG 2'