Fighter motion poster:  आज स्वातंत्र्यदिनानिमित्त अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan), अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या फायटर (Fighter) या चित्रपटाचं मोशन मोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या मोशन पोस्टमध्ये अनिल कपूर, हृतिक आणि दीपिका यांचा लूक दिसत आहे. फायटर हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


दीपिकानं फायटर चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरला तिनं कॅप्शन दिलं,"आपल्या गौरवशाली राष्ट्राला सलाम. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला थिएटरमध्ये रिलीज होणार फायटर. 25 जानेवारी 2024" आता फायटर चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.  






दीपिकानं शेअर केलेल्या या पोशन पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आम्ही खूप एक्सायडेट आहोत.' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आम्ही या चित्रपटाची वाट बघत आहोत'


हृतिकनं देखील सोशल मीडियावर फायटर चित्रपटाचं मोशन पोस्टर  शेअर केलं. या पोस्टरला त्यानं कॅप्शन दिलं, "वंदे मातरम्! भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चित्रपटगृहांमध्ये भेटूयात. फायटर 25 जानेवारी 2024 रोजी जगभरात रिलीज होत आहे."






फायटर या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केल आहे. हृतिकने याआधी सिद्धार्थसोबत वॉर या चित्रपटामध्ये काम केले आहे. तर दीपिकानं सिद्धार्थच्या 'पठान'या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. 


सिद्धार्थ आनंदनं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्याचा पठाण हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. पठाण चित्रपटात दीपितासोबतच शाहरुख खान,डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता सिद्धार्थच्या फायटर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या


Fighter First Look : हृतिक रोशनच्या 'फायटर'चा फर्स्ट लूक आऊट! रिलीज डेट जाहीर