Sunny Deol Gets Emotional: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2)चित्रपट बॉक्स ऑफिसवर गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं 12 दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर जवळपास  400.10 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला आणि चित्रपटामधील डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. गदर-2 चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केल्यानंतर आता सनी देओलनं एक खास व्हिडीओ शेअर करुन प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 


सनी देओलने (Sunny Deol) इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो भावूक झालेला दिसत आहे.  या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सनी देओल म्हणतो, 'सर्वांना नमस्कार, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार...तुम्हाला चित्रपट एवढा आवडेल, याचा मी विचारही केला नव्हता. आम्ही 400 कोटी क्रॉस केले आहेत. तुम्हाला गदर 2 आवडला, तुम्हाला तारा सिंह आवडला...'


पाहा व्हिडीओ






सनी देओलनं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'सर कृपया  लवकरात लवकर पुढच्या चित्रपटात काम करण्यास सुरुवात करा. लोकांना तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायचे आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तुम्ही आमचे आवडते कलाकार आहात'


सनी देओलचा 'गदर 2' चित्रपट 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला असून आता तो लवकरच 500 कोटींचा क्लबमध्ये सामील होईल, असा अंदाज सनीचे चाहते लावत आहेत. 


'गदर 2' हा 2001 मध्ये  रिलीज झालेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. गदर 2 चित्रपटामध्ये सनी देओलने तारा सिंहची भूमिका साकारली तर अमिषा पटेलने सकिनाची भूमिका साकारली.


'गदर 2' मधील कलाकार


सनी आणि अमिषासोबतच 'गदर 2' या चित्रपटामध्ये  लव्ह सिन्हा, सिमरित कौर आणि उत्कर्ष शर्मा  या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 'गदर 2' (Gadar 2) या चित्रपटात तारा सिंह आणि सकिना यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. अनेक सेलिब्रिटींनी तसेच नेटकऱ्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.


संबंधित बातम्या


Gadar 2 OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'गदर 2' ओटीटीवर येणार; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल...