Khalnayak 2 : 'खलनायक' (Khalnayak) हा सिनेमा 6 ऑगस्ट 1993 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. 1993 मध्ये गाजलेल्या या सिनेमाला आला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता या सिनेमाला 30 वर्ष पूर्ण होताच सिने-निर्माते सुभाष घई (Subhash Ghai) यांनी या सिनेमाच्या सीक्वेलबद्दल भाष्य केलं आहे. 


'खलनायक' हा बॉलिवूडपट ब्लॉकबस्टर ठरला होता. सुभाष घई म्हणाले,"खलनायक' या सिनेमाला 30 वर्ष पूर्ण झाल्याने 4 सप्टेंबर 2023 रोजी हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्याचा आमचा विचार आहे. 100 पेक्षा अधिक सिनेमागृहात हा सिनेमा पुन्हा रिलीज करण्यात येईल. 'चोली के पीछे क्या है' अशी सिनेमातील गाणी आजही सुपरहिट आहेत. माधुरी दीक्षितचा अभिनय आणि या गाण्यावरील तिचा डान्स आजही प्रेक्षकांना वेड लावतो". 


सुभाष घई पुढे म्हणाले,"मुक्ता आर्ट्सच्या बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आलेला 'खलनायक' सिनेमा पुन्हा एकदा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. खलनायक या सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. बल्लू बलरामला पुन्हा एकदा प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहता येईल. 'गदर 2' यशस्वी झाल्यामुळे 'खलनायक 2'ची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. 'खलनायक 2'मध्ये संजय दत्त आणि आणखी एक नवोदित अभिनेता स्क्रीन शेअर करताना दिसेल". 


संजय दत्त यांनी काही दिवसांपूर्वी 'खलनायक' सिनेमासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं होतं,"भारतीय सिनेसृष्टीतील महान दिग्दर्शक सुभाषजी, आणि 'खलनायक' सिनेमासंदर्भातील सर्व क्रू आणि टीमचे खूप-खूप अभिनंदन. 'खलनायक'सारख्या सिनेमाचा भाग असल्याच्या नक्कीच आनंद आहे. 30 वर्षांनंतरही हा सिनेमा ताजाचा आहे. या सिनेमाचा मला भाग बनवल्याबद्दल सुभाष घई यांचे खूप-खूप आभार". 






'खलनायक'बद्दल जाणून घ्या... (Khalnayak Movie Details)


'खलनायक' हा 1993 मध्ये आलेला बॉलिवूडपट आहे. सुभाष घई यांनी या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. या सिनेमात संजय दत्त (Sanjay Dutt) खलनायकाच्या भूमिकेत होता. तर माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि जॅकी श्रॉफही (Jackie Shroff) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. या सिनेमातील 'चोली के पीछे क्या है' हे गाणं खूपच गाजलं. 1993 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला होता.


संबंधित बातम्या


Sanjay Dutt: 'खलनायकच्या सिक्वेलमध्ये रणवीरने काम करु नये'; असं का म्हणाला संजय दत्त?