Sunny Deol Ameesha Patel Gadar 2 OTT Release : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. अल्पावधीतच या सिनेमाने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमाची सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 


'गदर 2' ओटीटीवर कधी येणार? (Gadar 2 Release On OTT)


'गदर 2'चे निर्माते यांनी ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की,"गदर 2' हा सिनेमा आणखी दोन महिन्यांनी ओटीटीवर रिलीज होईल. अद्याप ओटीटी रिलीजची तारिख ठरलेली नाही. दिवाळीच्या मुहुर्तावर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात येईल. 'झी 5' (Zee 5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होईल. सिनेमागृहाप्रमाणे ओटीटीवरदेखील हा सिनेमा चांगलाच धमाका करेल".


'गदर 2' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. पठाण, बाहुबली 2, केजीएफ 2, दंगल, संजू, पीके, टायगर जिंदा है, बजरंगी भाईजान, वॉर या सिनेमांप्रमाणे 'गदर 2' हा सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार करेल. 'गदर 2' या सिनेमा ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


'गदर'चा बॉक्स ऑफिसवर धमाका (Gadar 2 Box Office Collection)


'गदर 2' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 40.1 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी, तिसरा दिवस 51.7 कोटी, चौथा दिवस 38.7 कोटी, पाचवा दिवस 55.4 कोटी, सहावा दिवस 32.37 कोटी, सातवा दिवस 23.28 कोटी, आठवा दिवस 20.5 कोटी, नववा दिवस 31.07 कोटी, दहावा दिवस 38.9 कोटी आणि अकराव्या दिवशी 13.5 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या 11 दिवसांत आतापर्यंत या सिनेमाने 388.6 कोटींचा गल्ला जमवला आहे.


'गदर : एक प्रेम कथा' (Gadar) हा सिनेमा 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात सनी देओल (Sunny Deol), अमिषा पटेल (Ameesha Patel) आणि उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) मुख्य भूमिकेत आहेत. आता 22 वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग अर्थात 'गदर 2'प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'गदर' या सिनेमात तारा सिंह आणि सकिनाची प्रेमकहानी पाहायला मिळाली होती. तर 'गदर 3'मध्ये त्यांच्या मुलाला केंद्रीत करण्यात आले आहे.


'गदर 2' हुई जनता की...


#Gadar2HuiJantaKi हे सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे. चाहते सिनेमागृहातील जल्लोषाचे फोटो आणि व्हिडीओ हा हॅशटॅग वापरुन सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सनी देओलनेही आपल्या कुटुंबियांसोबत हा सिनेमा पाहिला आहे.


संबंधित बातम्या


Box Office Collection : 'गदर 2' अन् 'जेलर'चा जलवा कायम; 'OMG 2' आणि 'घूमर' थंडावला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...