Sunny Deol Bungalow : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. तर दुसरेकडे अभिनेत्याच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव (Sunny Deol Bunglow Auction) होणार असल्याचं समोर आलं होतं. पण आता या संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव होणार नसल्याचं समोर आलं आहे. बँकेने नोटीस मागे घेतली आहे. 


नेमकं प्रकरण काय? (Sunny Deol Bunglow Auction Case)


अभिनेता सनी देओलने बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) या बँकेकडून कर्ज घेतलं होतं. त्यासाठी मुंबईतील जुहू परिसरातील त्याचा 'सनी व्हिला' नामक बंगला अभिनेत्याने तारण म्हणून ठेवला होता. पण अभिनेत्याने या कर्जाची परतफेड केलेली नाही. 56 कोटी रुपयांची रक्कम थकवली होती. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी बँकेने अभिनेत्याच्या बंगल्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. एक जाहीरात प्रसिद्ध करत 51 कोटी 43 लाख रुपयांची बोली लावण्यात आली. 25 सप्टेंबरला हा लिलाव होणार होता. पण आता बँकेने ही नोटीस मागे घेतल्याचं समोर आलं आहे. 'गदर 2' या सिनेमाच्या कमाईमुळे सनी देओल परतफेड करू शकतो, असे म्हटले जात आहे. दरम्यान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत बँकेने त्यांचा निर्णय का बदलला असा प्रश्न उपस्थित केला आहे.







सनी देओलचा 'सनी व्हिला' हा बंगला 599.44 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेला आहे. हा लक्झरी बंगला दिसायला अतिशय आलिशान आहे. सनी देओलची एकूण संपत्ती 120 कोटींच्या आसपास आहे. एका सिनेमासाठी अभिनेता पाच ते सहा कोटी रुपये आकारतो. 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमासाठी अभिनेत्याने 20 कोटी रुपयांचं मानधन घेतलं असल्याचं म्हटलं जात आहे.


सनी देओलला पाकिस्तानात बंदी (Sunny Deol Banned in Pakistan)


बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि त्याच्या सिनेमांना पाकिस्तानात बंदी आहे. पाकिस्तानातील सिनेमागृहात अभिनेत्याचे सिनेमे दाखवले जात नाहीत. सनी देओलने देशप्रेमावर आधारित अनेक सिनेमे केले आहेत. तसेच पाकिस्तानाचा विरोध करणाऱ्या भूमिका त्याने साकारल्या आहेत. त्यामुळे त्याच्या सिनेमांचे शो न ठेवण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.


सनीच्या 'गदर 2'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला (Sunny Deol Gadar 2 Box Office Collection)


सनी देओल हा बॉलिवूडचा एक लोकप्रिय अभिनेता आहे. आपल्या दर्जेदार अभिनयाने त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. साठी ओलांडल्यानंतर आपणही बॉक्स ऑफिस गाजवू शकतो, हे सनीने दाखवून दिलं आहे. सनीचा 'गदर : एक प्रेम कथा' (Gadar : Ek Prem Katha) हा सिनेमा 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 22 वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला असून हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 377.2 कोटींची कमाई केली आहे. 'गदर 2' हा सिनेमा 500 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचं म्हटलं जात आहे.




संबंधित बातम्या



Sunny Deol : सनी देओल आणि त्याच्या सिनेमांना पाकिस्तानात बंदी; अभिनेत्याच्या मुंबईतील बंगल्याचाही होणार लिलाव; नेमकं प्रकरण काय?