Sachin Tendulkar At Abhishek Bachchan Ghoomer Screening : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) यांचा 'घूमर' (Ghoomer) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. आर. बाल्कि (R. Balki) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सिनेप्रेमींसह क्रिकेटप्रेमी या सिनेमाचं कौतुक करत आहेत. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सपत्निक 'घूमर' (Sachin Tendulkar At Ghoomer Screening) हा सिनेमा पाहिला आहे.


सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) आणि अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' (OMG 2) हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहेत. या सिनेमांच्या शर्यतीत आता अभिषेक बच्चनच्या 'घूमर' सिनेमाचाही समावेश झाला आहे. क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेडुंलकरनेही 'घूमर' (Ghoomer), रजनीकांतचा (Rajinikanth) 'जेलर', अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) हे सिनेमे पाहण्यापेक्षा अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांचा 'घूमर' हा सिनेमा पाहायला पसंती दर्शवली आहे. 






सचिन तेडुंलकरने सपत्निक पाहिला अभिषेक बच्चनचा 'घूमर'


क्रिकेट विश्व गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली तेंडुलकरसह (Anjali Tendulkar) 'घूमर' हा सिनेमा पाहिला आहे. मुंबईतील त्यांचे स्क्रीनिंगदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुपरकूल अंदाजात सचिन आणि अंजलीला पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तर दुसरीकडे सचिन आणि अंजलीसह त्यांची लाडकी लेक साराही (Sara Tendulkar) असायला हवी होती, असे चाहते म्हणत आहेत. साराने 'घूमर'च्या स्क्रीनिंगला हजेरी न लावल्याने चाहते नाराज झाले आहेत. 


'घूमर'च्या स्क्रीनिंगला सचिनने हजेरी लावल्याने सैयामी खेर आनंदी


अभिनेत्री सैयामी खेर सचिनची मोठी चाहती हे सर्वांनाच माहिती आहे. आता तिचा 'घूमर' सिनेमा पाहायला सचिन तेंडुलकर आल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सैयामी सचिनसोबतचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान अभिनेत्री खूपच आनंदी दिसत आहे. यावेळी सैयामी स्पोर्टी लूकमध्ये दिसत आहे. 'घूमर'चे दिग्दर्शक आर.बाल्कीदेखील सचिन तेंडुलकरचे मोठे चाहते असून या विशेष स्क्रीनिंगला त्यांनीदेखील हजेरी लावली होती. 


वीरेंद्र सेहवागनंही पाहिलाय 'घूमर' (Virender Sehwag Reaction ON Ghoomer)


सचिन तेंडुलकरआधी वीरेंद्र सेहवागनंही (Virender Sehwag) अभिषेक बच्चनचा 'घूमर' सिनेमा पाहिला आहे. सिनेमा पाहिल्यानंतर ट्वीट करत तो म्हणाला,"घूमर' हा क्रिकेटवर भाष्य करणारा एक चांगला सिनेमा प्रदर्शित झाला आहे. खेळाडूचा संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे. या सिनेमातील सर्वांनीच उत्तम काम केलं आहे. या सिनेमात क्रिकेट, प्रेरणा आणि भावना भरभरून आहेत".






संबंधित बातम्या


Ghoomer: 'मी स्पिनरला रिस्पेक्ट देत नाही, पण...' ;अभिषेक बच्चनचा घुमर पाहिल्यानंतर वीरेंद्र सेहवागनं दिली प्रतिक्रिया