मुंबई : अभिनेता सुनील शेट्टीला पितृशोक झाला आहे. त्याचे वडिल वीरप्पा शेट्टी यांचं दीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झालं. ते 93 वर्षांचे होते.
वीरप्पा शेट्टी यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी रात्री दीड वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती सुनील शेट्टीचे व्यवस्थापक विजय ग्रोवर यांनी दिली.
वीरप्पा शेट्टींच्या पाश्चात त्यांची पत्नी, मुलगा सुनील शेट्टी आणि मुलगी सुजाता आहेत. त्यांनी एक प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक म्हणून ओळख मिळवली होती.