Sumeet Raghvan : अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghvan) नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडत असतो. एकीकडे त्याने मांडलेल्या मुद्द्यांचं कौतुकही होतं. तर दुसरीकडे त्याला ट्रोलही केलं जातं. पण असं असूनही तो नेहमी सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. नुकतेच सुमीत राघवनने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. 


सुमीत राघवनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रस्त्यांवर सतत होत असलेले अपघात, ट्राफिक यासगळ्यांवर काय उपाय करता येईल हे सांगताना दिसत आहेत. अनधिकृत बस स्टॅंड, टॅक्सी स्टॅंड पुढील 24 तासांत हटवून टाका असा आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. सुमीतने व्हिडीओ शेअर करत योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे. सुमीतने शेअर केलेल्या व्हिडीओवर सुमीतचे चाहते कमेंट्स करत आहेत.





व्हिडीओ शेअर करत सुमीतने लिहिले आहे, एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी पहिल्यांदा रस्ते, स्पीड ब्रेकर अशा अनेक रस्त्यांच्या समस्यांबाबत बोलताना पाहत आहे. योगी आदित्यनाथ अतिशय पोटतिडकीने रस्त्यांच्या समस्यांवर भाष्य करत आहेत. योगी आदित्यनाथ तुम्हाला सलाम". महाराष्ट्रातदेखील अशा पद्धतीचे नियम लागू केले पाहिजेत आणि नागरिकांनी या नियमांचे पालन करावे, अशा प्रकारच्या कमेंट्स सुमीतचे चाहते करत आहेत. 


संबंधित बातम्या


मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बेशिस्तीमुळे सलील कुलकर्णी यांचा संताप, सुमीत राघवनकडूनही नाराजी


आमीर 'शिंडे' बोलतो, 'शिंदे' बोलणं किती कठीण आहे? : मराठी आडनावांच्या मोडतोडीवर सुमीत राघवनचा आक्षेप


नाट्यगृहात प्रेक्षकांचं वारंवार 'नॉक नॉक', सुमीत राघवननी प्रयोग थांबवला