एक्स्प्लोर
'सुलतान'ची घोडदौड कायम, दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई

मुंबई : ईदच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सुलतान सिनेमाला जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. ‘सुलतान’ने कमाईची घोडदौड दुसऱ्या दिवशीही कायम ठेवली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 'सुलतान'ने 37.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर बुधवारी, ‘सुलतान’ 36.54 कोटींसह यंदाच्या वर्षात पहिल्या दिवसात सर्वात मोठी कमाई सिनेमा ठरला होता. या सिनेमाची दोन दिवसातील कमाई 73.74 कोटी रुपये झाली आहे. सुलतान हा सिनेमा अली अब्बास जाफर यांनी दिग्दर्शित केला आहे. सलमान खानने सुलतान पैलवानाची भूमिका साकारली आहे. तर अनुष्का शर्माही मुख्य भूमिकेत आहे.
संबंधित बातम्या
फोटो – ‘सुलतान’ची रेकॉर्डब्रेक कमाई
‘सुलतान’चे दहा सुपरहिट डायलॉग
सुलतान का पाहावा?
Before You Go
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha





















