Jacqueline Fernandez: 200 कोटींच्या सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आज (5 एप्रिल) दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात (Patiala House Court) हजर झाली आहे. या प्रकरणात जॅकलिनही आरोपी असून, ईडीने तिची अनेकदा चौकशीही केली आहे.
200 कोटींच्या सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून जॅकलिन ही चर्चेत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. सुकेशवर अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलिनही आरोपी आढळली होती. यामध्ये अनेक साक्षीदार आणि पुराव्यांचा आधार घेण्यात आला. यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी केल्यानंतर तिच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता. 15 नोव्हेंबर 2022 रोजी जॅकलिनला नियमित जामीन मिळाला.
सुकेश चंद्रशेखरनं जॅकलिनला दिल्या होत्या महागड्या वस्तू
मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे सुकेश चंद्रशेखर हा सध्या अटकेत आहे. सुकेशने 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याप्रकरणात सर्वात आधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव समोर आले होते. त्यानंतर याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आले.
सुकेश चंद्रशेखरने 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख रूपये होती. तर प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली 36 लाख रूपयांची 4 पर्शियन मांजरं देखील जॅकलिनला देण्यात आली होती. दिग्गज लोकांसह अनेकांची फसवणूक केल्याचा सुकेशवर आरोप आहे.
सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरुमध्ये राहणारा एक उद्योजक आहे. आजवर अनेकांची फसवणूक केली आहे. नोकरी देण्याच्या आमिषाने त्याने अनेक गरजू मंडळींची फसवणूक केली आहे.
जॅकलिनचे चित्रपट
जॅकलीनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तिचा 'रामसेतू' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सिनेमात जॅकलीनसोबत नुसरत भरुचा आणि अक्षय कुमार यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता लवकरच तिचा फतेह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :