Suhani Bhatnagar Passed Away:  आमिर खानचा (Amir Khan) सुपरहिट चित्रपट 'दंगल'मध्ये (Dangal) छोट्या बबिता फोगटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे वयाच्या 19 व्या वर्षी निधन झाले असल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्री सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar) असं या अभिनेत्रीचं नाव असून ती काही काळ आजाराशी झुंज देत होती. एम्समध्येही तिच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुनही तिला वाचवण्यात यश आले नाही. 17 फेब्रुवारी 2024 रोजी सुहानीचा मृत्यू झाला. 


सुहानीच्या निधनामुळे तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माहितीनुसार, सुहानी फरिदाबादमध्ये कुटुंबासोबत राहत होती. शनिवारी सकाळी सुहानीने या जगाचा निरोप घेतला. काही दिवसांपूर्वी सुहानीचा अपघात झाला होता. त्यावेळी घेतलेल्या औषधांचा तिच्या शरीरावर वाईट परिणाम झाला आणि त्यामुळे तिच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. वृत्तानुसार, तिच्यावर अजरोंडा स्वर्गा आश्रमात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान तिच्या या निधनाच्या बातमीमुळे तिच्या चाहत्यांमध्ये देखील शोककळा पसरली आहे. 


सुहानीच्या अभिनयाचा प्रवास


सुहानी भटनागरने 2016 मध्ये आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुहानीला गाण्याची आणि नृत्याची खूप आवड होती.  पूजा भटनागर असं तिच्या आईचं नाव. बॉलीवूडमधील पदार्पणापूर्वी तिने अनेक जाहिरातींसाठी काम केलं आहे.  'दंगल' चित्रपटातील तिचं काम प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडली आणि ती प्रकाशझोतात आली. अगदी तरुण वयातच सुहानीने जगाचा निरोप घेतला असल्याने हळहळ व्यक्त केली जातेय. 


दंगल चित्रपटाच्या प्रमोशनचे केले होते फोटो शेअर


दंगलच्या प्रमोशनदरम्यानही सुहानीने तिच्या इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती दिग्दर्शक नितीश तिवारी आणि अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख यांच्यासोबत दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "गीता बबिता जूनियर, बबिता आणि दिग्दर्शक."










ही बातमी वाचा : 


Devara New Release Date : ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'ची रिलीज डेट ढकलली पुढे; आता 'या' दिवशी होणार रिलीज