Suhana khan Instagram Account : शाहरूख खानची मुलगी सुहाना खानने आपलं इन्स्टाग्राम अकाउंट पब्लिक केलं आहे. म्हणजेच, आता तिच्या अकाउंटवर पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडीओ तिच्या फॅन्सला दिसणार आहेत. दरम्यान, तिने तिचं अकाउंट पब्लिक करण्याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, suhanakhan2 नावाचं अकाउंट फार आधीपासूनच इन्स्टाग्रामवर आहे. परंतु, हे अकाउंट वेरिफाइड नव्हतं. जेव्हापासून हे अकाउंट व्हेरिफाइड झालं होतं, तेव्हापासून सुहाना खान चर्चेत होती. खास गोष्ट म्हणजे, सुहाना खान आपल्या इन्स्टाग्रामवर जास्त अॅक्टिव्ह नव्हती. तिच्या अकाउंटवर पहिला फोटो 29 ऑक्टोबर 2017मध्ये अपलोड करण्यात आला होता. परंतु, आता तीन वर्षात तिने आपल्या अकाउंटवर फक्त 21 पोस्ट केल्या आहेत.


आता सुहानाने जवळपास 11 आठवड्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ती, तिचा भाऊ अबराम आणि आर्यन एकत्र दिसत आहेत. खास गोष्ट म्हणजे, तिच्या अकाउंटवर मित्रांव्यतिरिक्त तिचं कुटुंबासोबतचे अनेक फोटो आहेत.

सुहानाचे आता जवळपास 1 लाख 41 हजार फॉलोअर्स आहेत. तर सुहाना 897 लोकांना फॉलो करते. सुहानाच्या फॉलोअर्समध्ये शॉहरूख खानसोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे.

सुहाना खानचं अभिनयात पदार्पण; शॉर्ट फिल्म 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' रिलीज

दरम्यान, सुहाना खानने अभिनयाच्या जगात पदार्पण केलं आहे. परंतु, तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला नसून तिने एका इंग्रजी शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे. तिची सर्वात पहिली शॉर्ट फिल्म 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' रिलीज झाली आहे. या शॉर्टफिल्ममध्ये सुहाना खानने 'सॅन्डी' नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. 'सॅन्डी' एक तरूण मुलगी आहे आणि तिला आपल्या बॉयफ्रेन्डला आई-वडिलांना भेटवण्याची इच्छा असते. संपूर्ण शॉर्ट फिल्ममध्ये फक्त दोन पात्र आहेत. एक सुहाना खान आणि तिचा मित्र रॉबिन गोनेला.

सुहाना खानने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. तिच्या बॉलिवूड डेब्यूबाबत अनेकदा चर्चा होत असतात. आपली अभिनयाची आवड जोपासताना सुहानाने एका मॅगझिनला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, 'द टेमपेस्ट' हे नाटक शाळेत साकारताना मी मिरांडा हे पात्र साकारलं होतं. येथे शिकण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. पण काम सुरु करण्याआधी मला युनिवर्सिटीमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करावं लागेल.'