मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सच्या पदार्पणाच्या चर्चा सुरु असून जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे यांच्यानंतर बॉलिवूडच्या किंग खानच्या मुलीच्या पदार्पणाच्या चर्चा होत आहेत. अशातच सुहाना खानने अभिनयाच्या जगात पदार्पण केलं आहे. परंतु, तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला नसून तिने एका इंग्रजी शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे. तिची सर्वात पहिली शॉर्ट फिल्म 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' रिलीज झाली आहेत.

Laal Singh Chaddha First Look | आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा'मधील फर्स्ट लूक रिलीज

या शॉर्टफिल्ममध्ये सुहाना खानने 'सॅन्डी' नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. 'सॅन्डी' एक तरूण मुलगी आहे आणि तिला आपल्या बॉयफ्रेन्डला आई-वडिलांना भेटवण्याची इच्छा असते. संपूर्ण शॉर्ट फिल्ममध्ये फक्त दोन पात्र आहेत. एक सुहाना खान आणि तिचा मित्र रॉबिन गोनेला.

जवळपास 10 मिनिटांच्या या छोट्याशा शॉर्ट फिल्ममध्ये सुहानाने आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं आहे. दरम्यान, या ही शॉर्टफिल्म इंग्रजी भाषेतील आहे.

येथे पाहू शकता शॉर्ट फिल्म -



सुहाना खानने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. तिच्या बॉलिवूड डेब्यूबाबत अनेकदा चर्चा होत असतात. आपली अभिनयाची आवड जोपासताना सुहानाने एका मॅगझिनला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, 'द टेमपेस्ट' हे नाटक शाळेत साकारताना मी मिरांडा हे पात्र साकारलं होतं. येथे शिकण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. पण काम सुरु करण्याआधी मला युनिवर्सिटीमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करावं लागेल.'