पिंक
2016मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटात तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसून आले होते. चित्रपटात अंगद बेदी व्हिलनच्या भूमिकेत होते. तसेच कृति कुल्हारी आणि एन्ड्रिया तैरंग यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटात कोर्टात सुरू असलेल्या कोर्ट केसबाबत सांगण्यात आलं आहे. समाज कशाप्रकारे एखाद्या महिलेचा पोषाख आणि तिची लाइफस्टाइलमुळे एखाद्या महिलेला जज करतो आणि ते किती चुकीचं आहे. याबाबत चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे.
थप्पड
डॉमेस्टिक वॉयलेन्सवर आधारीत असलेला तापसी पन्नूचा चित्रपट 'थप्पड' काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. कोणत्याही कुटुंबात एखाद्या महिलेचं महत्त्व, तिचं व्यक्तिमत्त्व, तिच्या गरजा आणि तिच्यासोबत होणाऱ्या प्रत्येक योग्य-अयोग्य गोष्टिंचा आरसा दाखवणारा तापसीचा थप्पड चित्रपट प्रत्येकाने पाहणं आवश्यक आहे.
पार्च्ड
2016मध्ये रिलीज करण्यात आलेला चित्रपट फार चर्चेत राहिला होता. मॅरिटल रेप, चाइल्ड मॅरेज, हुंड्याची प्रथा आणि घरगुती हिंसा यांसारख्या अनेक मुद्यांवर भाष्य करणारी पार्च्ड एक सुंदर चित्रपट आहे. दिग्दर्शक लीना यादव यांच्या चित्रपटात राधिका आपटे, तनिषा चटर्जी, सुरवीन चावला आणि लहर खान मुख्य भूमिकेत दिसून आल्या.
लिपस्टिक अंडर माय बुरखा
2016मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तवा यांनी केलं होतं. या चित्रपटात कोंकणा सेन शर्मा, अहाना कुमार, रत्ना पाठक, प्लबिता आणि विक्रांत मेस्सी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचं कथानक समाजाने तयार केलेल्या नियमांमध्ये दबलेल्या महिलांवर आधारीत आहे.
संबंधित बातम्या :
ऑलिव्ह ग्रीन ड्रेसमध्ये सारा अली खानचा क्लासी लूक; चाहते म्हणाले, 'माशाल्लाह'
PHOTO : 'मलंग'च्या प्रमोशदरम्यान स्पॉट झाली दिशा पाटनी; लूक होतोय व्हायरल
Sooryavanshi Teaser | बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी'चा हटके टीझर प्रदर्शित
'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज