Subodh Bhave : देशात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) आज चौथा टप्पा पार पडतो आहे. महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू आहे. सर्वसामान्यासह नेतेमंडळी आणि विविध सेलिब्रिटीदेखील मतदान करत आहे. `मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावेने (Subodh Bhave) पुण्यात मतदान केलं आहे. बदल घडला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या. तुम्हाला मतदानापासून वंचित ठेऊ शकत नाही. तुम्हाला जर त्यादिवशी मतदान करायचं असेल तर कोणतीच शक्ती तुम्हाला त्याच्यापासून बाजूला ठेऊ शकत नाही. जरूर मतदान करा, असं सुबोध भावे म्हणाला आहे.


सुबोध भावे म्हणाला,"जो तुम्हाला योग्य वाटतो त्याला मत द्या पण मत द्या. मत वाया घालवू नका. अनेकवेळा बोगस मतदानाचे प्रकार घडतात. तुमच्या नावावर कदाचीत दुसरं कोणीतरी मतदान करू शकतं.  तुमच्याकडे जर तुमचं नाव आलं नाही तर त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारा. त्याच्यापर्यंत ती माहिती पोहोचवा. आपल्याला माहिती आहे की आपलं मतदान कधी होणार आहे. लोकसभेचं असेल विधानसभेचं असेल. त्याच्याआधी एकदा आपल्याकडचं मतदान ओळखपत्र बरोबर आहे की नाही, आपलं यादीत नाव आहे की नाही या गोष्टी चेक करा. कारण हे आपलं प्रत्येकाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडलं पाहिजे".


इच्छा असेल तर कोणतीच शक्ती तुम्हाला मतदानापासून वंचित ठेऊ शकत नाही : सुबोध भावे


सुबोध भावे म्हणाला,"कोणतीही संघटना, कोणतीही कंपनी तुम्हाला मतदानापासून वंचित ठेऊ शकत नाही. तुम्हाला जर त्यादिवशी मतदान करायचं असेल तर कोणतीच शक्ती तुम्हाला त्याच्यापासून बाजूला ठेऊ शकत नाही. जरूर मतदान करा. प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला तुम्हाला सोयीचं, वयोवृद्ध माणसांना चालाव, चढावं लागणार नाही अशा ठिकाणी निवडणूक आयोगानं सगळ्या व्यवस्था उपलब्ध करुन दिल्या आहेत. वयोवृद्ध लोकांना घरबसल्या मतदान करण्याची सोय आहे. त्यामुळे राष्ट्रीय कर्तव्य, आपली जबाबदारी आहे त्यामुळे आपल्याला जो वाटेल तो उमेदवार देशाचं भवितव्य घडवू शकतो. आपल्याला उत्तम आयुष्य देऊ शकतो. त्यामुळे आवर्जुन घरातून बाहेर पडा आणि मतदान करा". 


अपेक्षांबद्दल सुबोध भावे म्हणाला,"मला राजकारणाबद्दल काहीच बोलायचं नाही. त्याविषयी शून्य आवड आहे. पण कोणाला मतदान करायचं हे मला माहिती आहे. तसेच मला माहिती आहे हे माझं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते मी पार पडलं. 


सुबोध भावेचं नागरिकांना आवाहान


मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सुबोध भावेने आवाहन केलं आहे की,"मत द्या. कंटाळा करू नका. मत द्यायला फक्त 5-10 मिनिटे लागतात. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाली तर जो उमेदवार तुम्हाला अपेक्षित नाही तो उमेदवार निवडून येऊ शकतो. बदल घडला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर घराबाहेर पडा आणि तुमचं मत द्या". 


संबंधित बातम्या


Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE Updates : राज्यात चौथ्या टप्प्यासाठी आज 11 मतदारसंघात मतदान; बीड, जळगाव, रावेर, छत्रपती संभाजीनगर, पुण्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला