Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE Updates : महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान, पुण्यात सर्वात कमी तर नंदूरबारमध्ये सर्वात जास्त मतदान

Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE Updates : देशात लोकसभा निवडणुकीचा आज चौथा टप्पा . महाराष्ट्रातील 11 मतदासंघात मतदान प्रक्रिया सुरू, मतदारराजा आज दिग्गजांचं भवितव्य ठरवणार...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 May 2024 09:23 PM
लंडनवरून येऊन तरुण मतदाराने बजावला मतदानाचा हक्क

पुणे जिल्ह्यात आज मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान झाले. विविध मतदान केंद्रावर परदेशातून खास मतदान करण्यासाठी आलेले मतदारदेखील पहावयास मिळत होते. डॉ. किरण तुळसे यांनी लंडनवरून येवून आपला मतदानाचा हक्क बजावून स्थानिक नागरिकांसमोर मतदानाचा हक्क बजावण्याचे एक आदर्श उदाहरण दिले. 


पिंपरी चिंचवड मधील  डॉ. किरण यांनी सोमवारी दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूलमध्ये मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. डॉ. किरण तुळसे हे मागील सहा वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत. 


आई, वडिलांचा सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत नोकरी करून कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मतदान करणे ही देखील आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे, हा विचार त्यांना मनात सतत येत होता. प्रत्येकाच्या एकेका मताने लोकशाही बळकट होत असते.  त्यामुळे मी आवर्जून लंडन येथून फक्त या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आलो आहे, असे डॉ. तुळसे यांनी सांगितले.
 

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले.


नंदुरबार - ६०.६०
जळगाव - ५१.९८
रावेर - ५५.३६
जालना - ५८.८५
औरंगाबाद - ५४.०२
मावळ - ४६.०३
पुणे - ४४.९०
शिरूर - ४३.८९
अहमदनगर - ५३.२७
शिर्डी - ५२.२७
बीड - ५८.२१

Maharashtra Lok Sabha Election : पुण्यात पाच वाजेपर्यंत 44.9 टक्के मतदान

Pune Loksabha Election : पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये पाच वाजेपर्यंत 44.9 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कसबा पेठमध्ये सर्वाधिक 51.07 टक्के मतदान झालेय, तर शिवाजीनगरमध्ये सर्वात कमी 38.73 टक्के मतदानाची नोंद झाली.

Maharashtra Lok Sabha Election : औरंगाबाद पाच वाजेपर्यंत 54.02 मतदान 

Aurangabad Loksabha Election : औरंदाबाद मतदार संघामध्ये पाच वाजेपर्यंत 54.02 टक्के मतदान झालेय. सहा विधानसभा मतदारसंघामध्ये 50 टक्केंपेक्षा जास्त मतदान झालेय. वैजापूरमध्ये सर्वाधिक 56.29 टक्के मतदान झालेय.

Maharashtra Lok Sabha Election : शिरुरमध्ये 43.89 टक्के मतदान

Shirur Loksabha Election : पाच वाजेपर्यंत शिरुरमध्ये 43.89 टक्के मतदान झाले आहे.  आंबेगाव वगळता एकाही विधानसभामध्ये 50 टक्केंपेक्षा जास्त मतदान झाले नाही. आंबेगावमध्ये 53.71 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. हडपसरमध्ये सर्वात कमी 38.04 टक्के मतदान झालेय. 



Maharashtra Lok Sabha Election : शिरुरमध्ये 43.89 टक्के मतदान

Shirur Loksabha Election : पाच वाजेपर्यंत शिरुरमध्ये 43.89 टक्के मतदान झाले आहे.  आंबेगाव वगळता एकाही विधानसभामध्ये 50 टक्केंपेक्षा जास्त मतदान झाले नाही. आंबेगावमध्ये 53.71 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. हडपसरमध्ये सर्वात कमी 38.04 टक्के मतदान झालेय. 



Maharashtra Lok Sabha Election : मावळमध्ये 46.03 टक्के मतदान 

Maval Lok Sabha Election : पाच वाजेपर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 46.5 टक्के मतदान झालेय. पनवेल, कर्जत, चिंचवड आणि पिंपरीमध्ये 50 टक्केंपेक्षा कमी मतदान झाले आहे. उरण आणि मावळमध्ये 50 टक्केंपेक्षा जास्त मतदान झालेय.

Maharashtra Lok Sabha Election : महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान, पुण्यात सर्वात कमी तर नंदूरबारमध्ये सर्वात जास्त मतदान

महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत ४२.३५टक्के मतदान


नंदुरबार - ४९.९१ 
जळगाव- ४२.१५ 
रावेर - ४५.२६  
जालना - ४७.५१ 
संभाजी नगर - ४३.७६
मावळ -३६.५४ 
पुणे - ३५.६१ 
शिरूर- ३६.४३ 
नगर- ४१.३५ 
शिर्डी -४४.८७ 
बीड - ४६.४९

दुपारी तीन वाजेपर्यंत बीड लोकसभेसाठी 46.49 टक्के तर रावेर लोकसभेसाठी 45.26 टक्के मतदान

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत बीड लोकसभा मतदारसंघासाठी  - 46.49 टक्के तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 45.26 टक्के मतदान झाले होते.   

अहमदनगरमध्ये तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाच हक्क, लोकांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पाहायला मिळतोय. मतदान करण्यासाठी मतदार गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. तृतीयपंथीही यात मागे नाहीत.अहमदनगरच्या श्री समर्थ विद्यामंदीर येथील मतदान केंद्रावर तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला आणि इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी आम्हाला मोठा संघर्ष करावा लागला त्यामुळे आम्ही मिळालेल्या हक्काचा उपयोग केला, अशी भावना तृतीयपंथीयांनी व्यक्त केली. 

पुण्याच्या मतदानानंतर संजय काकडेंनी आकडा सांगितला

भाजपचे नेते संजय काकडे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी महाराष्ट्रात 35 ते 38 जागा जिंकू, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला. पुणेकरांचा प्रतिसादा भाजपला राहिलाय, असा विश्वास देखील संजय काकडे यांनी व्यक्त केलाय. 

 Lok Sabha Election: राज्यात सकाळी 1 पर्यंत 31.85 टक्के मतदान

 Lok Sabha Election:  राज्यातील 11 मतदारसंघात ही प्रक्रिया पार पडत आहे. दुपारी 1 पर्यंत राज्यात 30.85  टक्के मतदान झाले आहे.  


राज्यभरात दुपारी 1 पर्यंत 31.85 टक्के


जळगाव – 31.70
जालना – 34.42
नंदुरबार – 37.33
शिरूर – 26.62
अहमदनगर – 29.45
संभाजीनगर - 32.37
बीड - 33.65
मावळ – 27.14
पुणे – 26.48
रावेर – 32.02
शिर्डी – 30.49

Pune Elections :  मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पांगारकर दाम्पत्य लंडनहून पुण्यात

Pune Elections :  मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ऋषिकेश पांगारकर लंडनहून पुण्यात आलेत. मतदान हा अधिकार आहे तो अधिकार बजावण्यासाठी 13 तास प्रवास करून ऋषिकेश पुण्यात आले आहेत. परवा पुण्यात आल्यानंतर आज त्यांनी मतदान केले आणि पुन्हा ते लंडनला जाणार आहेत. ऋषिकेश पांगारकर पेशाने आर्किटेक्ट आहेत. तर त्यांची पत्नी स्नेहा पांगारकर या पेशाने जर्मन ट्रेसलेटर आहेत.

पारनेरमध्ये लोकांना पैसे वाटले जात आहेत, निलेश लंके यांचा गंभीर आरोप

अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. पारनेरमध्ये मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटले जात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. हा दावा करताना त्यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. 





Pune Lok Sabha Election: सिरम ग्रुप चे CEO आदर पूनावाला यांनी बजावला मतदानाचा हक्क..

Pune Lok Sabha Election: सिरम ग्रुप चे CEO आदर पूनावाला यांनी ह्यूममँकेनरी स्कूल सॅलिसबरी पार्क पुणे  येथे मतदानाचा हक्क बजावला .

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदारांमध्ये उत्साह

मतदानाच्या दिवशी एक प्रकारे सकारात्मक चित्र छत्रपती संभाजीनगरच्या  अनेक मतदान केंद्रांवर पाहायला मिळत आहे. अगदी दुपारी 12 नंतर सुद्धा मतदान केंद्रांवर लांब रांगा मतदारांच्या  पाहायला मिळत आहेत. ऊन कमी असल्याने मतदारांचा उत्साह सुद्धा  मतदान केंद्रांवर पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजी नगर मधील  पुरुष असतील, महिला मतदार असतील किंवा फर्स्ट टाइम वोटर्स असतील त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा हक्क रांगेत लावून बजावला आहे 

शिरुरमध्ये बोगस मतदानाचा आरोप

शिरुर लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप. राजगुरूनगच्या हुतात्मा राजगुरु नगरमध्ये बोगस नावाने मतदान, धक्कादायक घटना

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 11 वाजेपर्यंत 17.51 टक्के मतदान

चौथ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे


नंदुरबार - २२.१२ टक्के
जळगाव-  १६.८९ टक्के
रावेर - १९.०३ टक्के
जालना - २१.३५ टक्के
औरंगाबाद  -  १९.५३ टक्के
मावळ -१४.८७ टक्के
पुणे - १६.१६ टक्के
शिरूर-   १४.५१ टक्के
अहमदनगर- १४.७४ टक्के
शिर्डी -१८.९१  टक्के
बीड - १६.६२ टक्के

खरा व्हिडीओ बाहेर येणे गरजेचे, पैसे वाटपाच्या त्या कथित व्हिडीओवर सुजय विखे यांची प्रतिक्रिया

पारनेरचे भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे यामध्ये रस्त्यावरती पैसे पडलेले आहेत तर राहुल शिंदे गाडीच्या बाजूला उभे आहेत. राहुल शिंदे यांच्यावर पैसे वाटप करण्याचा आरोप होत आहे. याबाबत बोलताना महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी म्हटले की , पारनेरमधील जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो एकाच बाजूचा असून खरा व्हिडिओ समोर येणे गरजेचे आहे. पैसे गाडीत नव्हे तर गाडी बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे पैसे कोणाचे आहेत हे सांगायची गरज नाही. अहमदनगर जिल्ह्यातील गुंडगिरीचे राज्य पारनेरमधील जनताच उद्ध्वस्त करणार आहे. अशी प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.


 

श्रीराम पाटील यांच्याकडून सहकुटुंब मतदान

चार जूननंतर राज्यातील दोन पक्ष संपणार : चंद्रशेखर बावनकुळे 

आज मतदान होणाऱ्या अकराही जागा महायुती जिंकेल. पुढचा पाचवा टप्पा सुद्धा 2019 पेक्षा जास्त फरकाने जिंकू. चार जूननंतर राज्यातील दोन पक्ष मशाल अन् तुतारी संपणार, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये केले. 

चंद्रकांत खैरेंकडून सहकुटुंब मतदान

चंद्रकांत खैरे यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला.  चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारात  संपूर्ण त्यांचं कुटुंब उतरलेले पाहायला मिळालं होते.  चंद्रकांत खैरे यांच्यासोबत आम्ही चार टर्म, त्यांचं खासदारकीचे काम पाहिले आहे.   मागची एक टर्म ते हरले  त्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो असं आम्हाला वाटते. यावेळी  100% आम्हाला गॅरंटी आहे,  चंद्रकांत खैरे यावेळी निवडून येतील, असा विश्वास खैरेंच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.

गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्यादिवशीच लोकसभेचा निकाल

पंकजा मुंडे यांच्या बीड लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. या मतदानाचा निकाल 4 जून रोजी जाहीर होईल. त्याचदिवशी मी माझे वडील गोपीनाथ मुंडे यांना अग्नी दिला होता. त्याच दिवशी निकाल येतोय, हा आश्चर्यकारक योगायोग असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

Pune Agitation:  पुण्यातील फडके हौद चौकात भाजपचं आंदोलन, काँग्रेसकडून लावण्यात आलेल्या बॅनरविरोधात ठिय्या

Pune Agitation:   पुण्यातील कसबा पेठेतील फडके हौद चौकात भाजपचे कार्यकर्ते हेमंत रासनेंच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करतायत.  फडके हौद चौकात कॉंग्रेसकडून लावण्यात आलेले बॅनर अनधिकृत असून पोलीस त्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप करत भाजपकडून हे ठिय्या आंदोलन करण्यात येतय.

रावेरमध्ये मविआचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार - रोहिणी खडसे 

लोकशाहीमध्ये मतदान महत्त्वाचे आहे. मी माझ्या मतदानाचा कर्तव्य पार पाडले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने रावेरमध्ये विजयी होईल, असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला.

Pune Lok Sabha :  पुण्यात मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Pune Lok Sabha :  पुण्याच्या निगडी येथील ज्ञान प्रबोधनी नवघर विद्यालयात मोबाइल घेऊन आलेल्या मतदारांना परत पाठवले जात आहे. यावरून  केंद्रावरील कर्मचारी आणि मतदारांमध्ये चांगलेच खटके उडताना पहायला मिळत आहे. त्यामुळे मतदान कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळत आहे. 

Maval Lok Sabha: मावळ लोकसभा मतदारसंघ सकाळी 9 पर्यंत 5.38 टक्के मतदान

 Maval Lok Sabha: मावळ लोकसभा मतदारसंघ सकाळी 9 पर्यंत 5.38 टक्के मतदान 


चिंचवड - ६.९० टक्के
कर्जत - ५.१५
मावळ - ३.४१
पनवेल - ५.२३
पिंपरी - ४.३३
उरण - ६.४८ टक्के

जळगावमध्ये किती टक्के मतदान झालं?

सकाळी नऊ वाजेपर्यंत जळगावमध्ये 6.14 टक्के मतदान झालं आहे. 

Nandurbar Lok Sabha Seat : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 9 पर्यंत किती टक्के मतदान?

नंदुरबारमध्ये सकाळी नऊ वाजेतपर्यंत 8.43 टक्के मतदान  पार पडलं आहे.

सुजय विखे यांनी बजावला मतदानाच हक्क

सुजय विखे यांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. ते अहमदनागरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून निलेश लंके निवडणूक लढवत आहेत. 

जनता मला सकारात्मक प्रतिसाद देणार- सुजय विखे पाटील

माझ्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवण्यात आली. गेल्या वर्षी मी नवखा होतो. यावेळी जनता सकारात्मक प्रतिसाद देणार आहे, असा मला विश्वास आहे, असे सुजय विखे म्हणाले. ते अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. 

Lok Sabha Elections: राज्यात 11 मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.45 टक्के मतदान 

 Lok Sabha Elections:  राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी सातपासून सुरु झाले आहे. चौथ्या  टप्प्यातील एकूण 11  मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले आहे.


 एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे


जळगाव-  6.14 टक्के
जालना - 6.88 टक्के
नंदुरबार - 8.43 टक्के
शिरूर-   4.97 टक्के
अहमदनगर-  5.13 टक्के
औरंगाबाद  -  7.25 टक्के
बीड - 6.72 टक्के
मावळ -5.38 टक्के
पुणे - 6.61  टक्के
रावेर - 7.14  टक्के
शिर्डी - 6.83  टक्के

पंकजा मुंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

बीड: भाजपच्या पंकजा मुंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क. मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन. परळीतील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद

मी माझं कर्तव्य पार पाडलं, पूर्ण ताकदीने चंद्रकांत खैरेंचा प्रचार केला: अंबादास दानवे

मी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. इच्छा व्यक्त करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. मात्र, जो निर्णय पक्षप्रमुखांनी दिला त्यानुसार मी माझं कर्तव्य पूर्णपणे पार पाडलेले आहे.  मी चंद्रकांत खैरे यांचा पूर्णपणे प्रचार केला आहे. मला विश्वास आहे खैरे  ही निवडणूक जिंकतील. भुमरे तुम्ही जर उमेदवार बघत असाल तर तुम्हाला  पाणी पाहिजे की दारू ? याचा विचार मतदारांनी करावा. जलील म्हणजे जातीयवादी... जातिवाद करायचा आणि तो शहरांमध्ये  दिसत होता त्यामुळे.. लोक योग्य तो निर्णय मतदान करताना घेतील, अशी अपेक्षा अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.

रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्या बाजूनेच मतदार- एकनाथ खडसे

निवडणूक म्हटलं की आव्हान असतंच. रक्षा ताईंनी रावेरमध्ये चांगले काम केले आहे. सध्या रक्षा खडसे यांच्या बाजूनेच रावेरमध्ये वातावरण आहे. त्यामुळे या जागेवर रक्षा खडसे याच निवडून येतील, असे मला वाटते असे एकनाथ खडसे म्हणाले.

रावेरमध्ये एकनाथ खडसेंनी बजावला मतदानाचा हक्क

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज रावेरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. यावेळीदेखील त्या येथून निवडणूक लढवत आहेत. 

मतदारांनी उमेदवाराला मत देताना सगळ्या गोष्टींचा विचार करावा: अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धीत मतदानाला. उमेदवाराचे चारित्र्य तपासा, त्याच्यावर कोणता कलंक आहेत का ते बघा, डोळसपणे मतदान करा, अण्णा हजारे यांचे मतदारांना आवाहन

ही माझी शेवटची निवडणूक असेल आणि त्यामुळे माझ्यासमोर आव्हान नाही, विजयाचा विश्वास आहे: चंद्रकांत खैरे

छत्रपती संभाजीनगर: ही माझी शेवटची निवडणूक असणार आहे. मला विजयाची पूर्णपणे खात्री आहे. शिवसेनेसोबत गद्दारी करून जे लोक गेले ते माझ्या विरोधात उभे आहेत. मला आता या वेळेस कोणाचे आव्हान  नाही. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. 20 वर्षे मी शहर शांत ठेवले आहे. दारुचे दुकान असणारे उमेदवार माझ्याविरोधात. ही माझी निवडणूक लढवायची सहावी वेळ आहे  त्यामुळे ही अखेरची निवडणूक माझी असेल त्यानंतर इतर जे तयार झालेले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत  त्यांना सुद्धा संधी मिळायला हवी: चंद्रकांत खैरे

Medha Kulkarni:  पुणेकर मोठ्या संख्येने मुरली मोहोळांना मतदान करतील मला पूर्ण विश्वास आहे : मेधा कुलकर्णी

Medha Kulkarni:  खासदार मेधा कुलकर्णी यांनी विश्वास दर्शवला आहे.  मुरली मोहोळ लोकसभेचे खासदार होतील आणि आम्ही दोघं खासदार म्हणून दिल्लीला असू आणि पुणे शहराच्या विकासासाठी होईल ते प्रयत्न करू.. लोक मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी नक्कीच मतदान करतील. पुणेकर मोठ्या संख्येने मतदान करतील मला पूर्ण विश्वास आहे, असे मेधा कुलकर्णी म्हणाल्या. 

शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन सदाशिव लोखंडे मतदानाला

महायुतीचे शिंदे गटाचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क. शिर्डी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी केलं मतदान

Maval Lok Sabha Election:मावळची जनता मला तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून देईल: श्रीरंग आप्पा बारणे

Maval Lok Sabha Election: मावळची जनता मला तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून देईल. मावळमध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनता मला निवडून देईल. विरोधकाच्या टिकेवर मी आज काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया मावळचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी दिली

Wadgaonsheri Lok Sabha: वडगावशेरीतील पुणे इंटरनॅशनल स्कूल मतदान केंद्रावर गेल्या अर्धा तासांपासून नागरिक खोळंबले

Wadgaonsheri  पुण्यातील वडगावशेरी भागात असलेले मतदान केंद्रावर नागरिक खोळंबले. मतदान करण्यासाठी आलेले नागरिक गेल्या अर्धा तासांपासून रांगेत उभे आहे.  पुणे इंटरनॅशनल स्कूल या मतदान केंद्रावर गेल्या अर्धा तासांपासून नागरिक रांगेमध्ये  आहे.  या ठिकाणी असलेल्या एका मतदान खोलीत ईव्हीएम चालत नसल्यामुळे नागरिकांचा खोळंबा झाला आहे. प्रशासनाकडून दुसरे ईव्हीएम मशीन आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  

Jalgoan Lok Sabha Seat : मतदार, नेते पाठिशी असल्यानं विजयाची खात्री : स्मिता वाघ

जळगाव लोकसभेचे मतदार, नेते पाठिशी असल्यानं विजयाची खात्री आहे, असं  भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी म्हटलं. 

मी दोन लाख मतांच्या लीडने विजयी होणार- निलेश लंके

अहमदनगर : माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी लढाई आहे. आनंद होतोय की, सर्वसामान्य कुटुंबातून येऊनदेखील गावाने मला सरपंच ते आमदार केलं. समोरच्या उमेदवाराकडे राजकीय वारसा आहे. पण सगळीकडे वारसा चालत नाही. याआधी मी वारसदारांच्या विरोधातच लढाई केली. त्यांना चारीमुंड्या चित केलं. समोरच्या उमेदवारांकडून पोलिसांच्या मदतीने मतदारांना धमकवण्याचा प्रयत्न झाला. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे. मतदारसंघात पैसाचा पाऊस झाला. पण सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे 2 लाखाच्या लीडने मी विजय होईल, असे निलेश लंके म्हणाले.

Amol Kolhe : शरद पवार पाठीशी, आपला विजय नक्की: अमोल कोल्हे

Amol Kolhe : शरद पवार आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, आपला विजय नक्की आहे, अशा विश्वास शिरुर महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंनी  व्यक्त केला आहे. 

 Maval Lok Sabha Election :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार  संजोग वाघेरे यांनी मतदानाचा हक्क बजावला

 Maval Lok Sabha Election : मावळचे माविआ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार  संजोग वाघेरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

Maval Lok Sabha Election:  मावळातील पनवेल,उरण विधानसभा मतदारसंघात मतदानासासाठी नागरिकांच्या रांगा

Maval Lok Sabha Election:  मावळ लोकसभा  मतदारसंघातील पनवेल,उरण विधानसभा मतदारसंघात मतदानासासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत.  पनवेल , उरण , कर्जत हा कोकणातील भागही मतदारसंघाच सामील आहे.  सकाळपासून लोकांच्या मतदानासाठी रांगा लागल्या आहेत.  उन्हाचा त्रास होवू नये म्हणून सकाळी मतदान करण्याला लोकांची पसंती आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बिघडल्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बिघडल्या. मतदान प्रक्रिया ठप्प. बीडच्या परळीमध्येही मतदान केंद्रावरील ईव्हीएम बिघडल्याने केंद्राबाहेर मतदारांची रांग

प्रत्येक निवडणूक एकदाच लढलो आणि जिंकलो- निलेश लंके

मी माझ्या राजकीय हंगामात प्रत्येक निवडणूक एकदाच लढलो आणि जिंकलो. मी आज प्रत्येक पदाला न्याय दिला. मी जर खासदार म्हणून निवडून आलो चांगले काम करेन, असे निलेश लंके म्हणाले. 

Nandurbar Lok Sabha Seat : नंदुरबारमध्ये हिना गावित आणि गोवाल पाडवी आमने सामने

नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित आणि काँग्रेसचे गोवाल पाडवी आमने सामने आहेत. 

राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

एकूण 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. रवींद्र धंगेकर, निलेश लंके, रावसाहेब दानवे यांच्यासह प्रमुख नेते सकाळीच मतदानाला निघाले.

Jalgaon Lok Sabha Seat : जळगावात स्मिता वाघ यांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Nilesh Lanke Voting : निलेश लंके यांनी बजावला मतदानाचा हक्क

महाविकास आघाडीचे अहमदनगरचे उमेदवार निलेश लंके यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.

Jalgon Lok Sabha Seat : जळगावात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ मतदान केंद्रावर दाखल

Jalgon Lok Sabha Seat : जळगावात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ मतदान केंद्रावर दाखल झाल्या आहेत. स्मिता वाघ यांच्यापुढे ठाकरेंच्या सेनेच्या करण पवार यांचं आव्हान आहे.

अहमदनगरमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे यांच्यात प्रमुख लढत

अहमदनगरमध्ये भाजपचे सुजय विखे विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. 


शिर्डी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे आणि  ठाकरे यांच्या शिवसेनेनचे भाऊसाहेब वाघचौरे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

आम्ही महाराष्ट्रात 45 जागा जिंकू: रावसाहेब दानवे

मी विरोधकांवर एकही आरोप केला नाही. माझ्याकडे सांगायला विकासाची खूप काम होती. राज्यातील हिंदुत्त्ववादी मतदारांनी भाजपला सोडलेलं नाही. आम्ही राज्यात 45 जागा जिंकू. आमच्याविरोधात सगळे विरोधक आहेत, तरी आम्ही त्यांना यशस्वीपणे तोंड देतो: रावसाहेब दानवे

Shirur Lok Sabha Election: शिरूर लोकसभा मतदारसंघात 32 उमेदवार रिंगणात

Shirur Lok Sabha Election: शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाला सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये खरी लढत असणार आहे. 



  •  शिरुर लोकसभा मतदारसंघात - 2509 मतदान केंद्र

  • एकूण - 32 उमेदवार रिंगणात आहेत

  • 7527 बॅलेट युनिट

  • मतदार- 25 लाख 39 हजार 702

  •  पुरुष मतदार - 13 लाख 36 हजार

  • महिला मतदार -12 लाख 2 हजार

Ravindra Dhangekar : लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करणे आवश्यक : रविंद्र धंगेकर

Ravindra Dhangekar : आज ऊन, वारा पाऊस विसरुन पुणेकरांनी मतदानासाठी बाहेर पडावे. लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केले आहे. 

Ahmednagar Lok Sabha Election: बारामतीप्रमाणे अहमदनगरमध्ये पैशांचे वाटप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नीलेश लंकेंचा आरोप

Ahmednagar Lok Sabha Election:  बारामतीसारखी पैसे वाटपाची पुनरावृत्ती अहमदनगर लोकसभा क्षेत्रात सुद्धा भाजपने कायम ठेवली.  परंतु या धनशक्तीला जनशक्ती पुरून उरणार. भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे याला पैसे वाटतानाच्या या व्हिडीओची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नीलेश लंके ट्वीट करत केली आहे.  अहमदनगर लोकसभेसाठी भाजपाचे सुजय विखे-पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नीलेश लंके यांच्यात सामना होणार आहे.  





छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र पोलिसांसोबत केरळ पोलीसांची सुरक्षा तैनात

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. 2040 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. यामध्ये महाराष्ट्र पोलिसांसोबत केरळ पोलीस सुद्धा अतिरिक्त सुरक्षेसाठी बोलवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदार संघात विविध संवेदनशील ठिकाणी  केरळ पोलीस आणि सीआयएसएफचे जवान हे तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात जवळपास 800  केरळ पोलीस हे महाराष्ट्र पोलिसांना मतदान प्रक्रियेच्या दिवशी सहकार्य करणार आहेत. 

Raver Lok Sabha :  रावेरमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर मॉक पोल प्रक्रिया

Raver Lok Sabha :  रावेरमध्ये मतदान प्रक्रिया सुरू होण्याआधी प्रत्येक मतदान केंद्रावर मॉक पोल प्रक्रिया पूर्ण करण्यात आली

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 2 हजार 40 मतदान केंद्रांवर मतदान

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 2 हजार 40 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.. या मतदानासाठी  महाराष्ट्र पोलिसांसोबत केरळ पोलीस सुद्धा अतिरिक्त सुरक्षेसाठी बोलवण्यात आले आहेत. 

मराठवाड्यातील मतदानाकडे साऱ्यांचे लक्ष

बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातली लढतींकडे राज्याचे लक्ष. मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरणार का? बीडमध्ये पंकजा मुंडे आणि जालन्यात राबसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आणि संदिपान भुमरे यांच्यात लढत.

Shirdi Lok Sabha Election:  शिर्डीमध्ये आज चौथ्या टप्प्यात मतदान

Shirdi Lok Sabha Election:  शिर्डीमध्ये आज चौथ्या टप्प्यात मतदान होतंय. इथल्या महिला मतदारांची अजूनही पाण्यासाठी कसरत सुरू आहे.. पहाटे पाण्यासाठी इथ त्यांना रांगा लावाव्या लागतात. दरम्यान सर्व काम आटोपून आपण मतदानाला जाणार असल्याचं महिलांनी सांगितलं. 

पार्श्वभूमी

Lok sabha Election 2024:  राज्यात आज चौथ्या टप्यातील राज्यातील 11 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या राज्यातील लोकसभा जागा आहेत. या मतदारसंघांत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  यातल्या सहा लढती अतिशय चुरशीच्या मानल्या जातायत.. बीड, पुणे, शिरुर, छत्रपती संभाजीनगर, रावेर आणि अहमदनगरमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.  


चौथ्या टप्प्यातील लढती 


 महाराष्ट्रात कुठे होणार पहिल्या टप्प्यातील मतदान आणि उमेदवार 


• पुणे - मुरलीधर मोहोळ (भाजपा) विरुद्ध रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
• बीड - पंकजा मुंडे (भाजपा) विरुद्ध बजरंग सोनावणे ( राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष )
• शिरुर - अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ) विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील ( राष्ट्रवादी)
• छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - संदिपान भुमरे ( शिवसेना), चंद्रकांत खैरे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ), इम्तियाज जलील (एआयएमआयएम)
• जालना - रावसाहेब दानवे (भाजपा) विरुद्ध कल्याण काळे (काँग्रेस)
• अहमदनगर - सुजय विखे-पाटील (भाजपा) विरुद्ध नीलेश लंके (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष )
• मावळ -  श्रीरंग बारणे ( शिवसेना) विरुद्ध संजोग वाघेरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
• शिर्डी - सदाशिव लोखंडे ( शिवसेना ), भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ), उत्कर्षा रुपवते (वंचित बहुजन आघाडी)
• रावेर - रक्षा खडसे (भाजपा) विरुद्ध श्रीराम पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
• जळगाव - स्मिता वाघ (भाजपा) विरुद्ध करण पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
• नंदुरबार - हिना गावित (भाजपा) विरुद्ध गोवल पाडवी (काँग्रेस)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.