मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाल्याचा दावा अनेकांकडून करण्यात येत आहे. सुशांतने आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं होतं. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही सुशांतचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याच्या व्हिसेरा रिपोर्टमधूनही सुशांतच्या शरीरात कोणत्याच प्रकारचं केमिकल किंवा विष सापडलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. अशातच सोमवारी रात्री उशीरा एम्सच्या फॉरेन्सिक टीमने सीबीआयडे यासंदर्भाती आपला अहवाल सोपावला आहे.


एम्सने दिलेल्या अहवालातून असा दावा करण्यात आला आहे की, सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे झालेला नाही. एम्सच्या अहवालात सांगण्यात आलं आहे की, सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे केमिकल्स किंवा विष आढळून आलेलं नाही. तसेच एम्स रुग्णालयातील फॉरेन्सिक टीमने कूपर रूग्णालयाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर प्रश्नही उपस्थित केले आहेत. आता सीबीआय एम्सने दिलेल्या या अहवालाच्या आधारे आपल्या तपासाची पुढची दिशा ठरवणार आहे.


कूपर रूग्णालयाच्या अहवालावर प्रश्न


रिपोर्टनुसार, एम्सच्याने दिलेल्या अहवालात कूपर रुग्णालयाला क्लीन चिट दिलेली नाही. एम्सच्या रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, कूपर रूग्णालयाने पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये टायमिंग दिलेला नाही. मेडिकल टीमचे चेअरमन डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की, अंतिम रिपोर्टसाठी काही कायदेशीर बाबी पडताळाव्या लागतील.


सुशांतचा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे झाल्या या चर्चांना पूर्णविराम


एम्सने दिलेल्या अहवालातून समोर आलेल्या बाबींमुळे सर्व शंकांवर पूर्णविराम लागला आहे. सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृत्यू नाही तर त्याची हत्या झाली आहे. त्याला विष देण्यात आलं होतं, यांसारख्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. एम्सने दिलेल्या अहवालात सांगण्यात येत आलं आहे की, सुशांतचा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे झालेला नाही, त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारच्या विषाचे अंश सापडलेले नाहीत. त्यामुळे आता सर्वच चर्चा आणि शंकाना पूर्णविराम मिळाला आहे.


पाहा व्हिडीओ : सुशांत सिंह राजपूतच्या शरिरात विषारी अंश सापडले नाहीत; एम्सचा अहवाल



अनेक पैलू तपासत आहे सीबीआय


काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या वतीने सांगण्यात आलं होतं की, 'सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास सीबीआय व्यवस्थित करत असून या प्रकरणातील अनेक बाबी लक्षात घेतल्या जात आहेत.'


सुशांतच्या कुटुंबियांच्या वकीलांचा सीबीआय तपासावर संशय


सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनीही सीबीआयच्या कामावर शंका उपस्थित केली होती. सीबीआय इतक्या जलद गतीने काम करत असेल तर त्यांनी आत्तापर्यंत काहीतरी निष्कर्ष काढणं आवश्यक होतं असं त्यांचं म्हणणं होतं. शिवाय, सुशांतच्या कुटुंबियांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सुशांतच्या मृत्यूबद्दल काहीतरी समोर यायला हवं असा आग्रह सुशांतच्या कुटुंबियांनीही धरला होता. यावर लवकर भाष्य झालं नाही तर दिल्लीत उपोषण करण्याचा इशाराही सुशांतच्या कुटुंबियांनी दिला होता.


सुशांतच्या वकीलांनी केलेल्या आरोपांचं सीबीआयकडून खंडन


सीबीआय सातत्याने सुशांतच्या मृत्यूचा तपास करतं आहे. सातत्याने उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका, तपासावरून होणारे आरोप यावर आता सीबीआयने मात्र आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सीबीआयने आपण कसून तपास करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. सुशांतचा मृत्यू ही हत्या होती, वा आत्महत्या होती यापैकी कोणत्याही एका निकषावर आम्ही अजून आलेलो नाही. कारण अद्याप तपास चालू आहे. आम्ही आमच्या वेगाने तपास करत असून योग्य वेळी आम्ही आमच्याकडे असलेली माहीती देऊ असं सीबीआयने सांगितलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :