SS Rajamouli On Success Formula : एसएस राजामौली (SS Rajamouli) सध्या ब्लॉकबस्टर 'आरआरआर' (RRR) या सिनेमामुळे जगभरात चर्चेत आहेत. नुकतचं या सिनेमाला मानाच्या 'गोल्डन ग्लोब' पुरस्कारासाठी नामांकन (Golen Globes 2023 Nomination) मिळालं आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावात या सिनेमाला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत एसएस राजामौलींनी त्यांच्या यशाचं गुपित सांगितलं आहे. 


एसएस राजामौलींच्या यशाचं गुपित काय? (SS Rajamouli Success Formula) :


एसएस राजामौली हे एक लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. यशाचं गुपित उलगडताना एसएस राजामौली म्हणाले,"खरंतर माझ्या यशाचे कोणतेही गुपित नाही. प्रत्येक कलाकृतीदरम्यान प्रेक्षकांचा विचार करणं गरजेचं आहे. तसेच सोयीस्कररित्या काम करणं टाळायला हवं. नव-नवीन प्रयोग करायला हवे. त्यानंतर तुमच्या सिनेमाला चांगले यश मिळाले तर तुम्हाला खऱ्या अर्थाने समाधान मिळते. 




एसएस राजामौली पुढे म्हणाले,"प्रेक्षकांना काय आवडतं, त्यांना काय हवं आहे या बाबी विचारात घ्यायला हव्यात. प्रेक्षकांचा विचार करून सिनेमांची निर्मिती करायला हवी. जे चालतं तेच विकलं जातं. त्यामुळे तुम्हाला भावलेली एखादी गोष्ट लोकांना भावेल असं होत नाही. त्यामुळे चाहत्यांच्या आवडी-निवडीचा विचार करावा". 


'आरआरआर' (RRR) या सिनेमाने भारतासह जगभरात धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने जगभरात चांगलीच कमाई केली आहे. या सिनेमाची कथा बंडखोर भीम आणि अल्सुरी सीताराम राजून यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. 


लवकरच येणार 'आरआरआर 2' (RRR 2)


एसएस राजामौलींनी 'आरआरआर'च्या दुसऱ्या भागाच्या तयारीला सुरुवात केली आहे. लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरू आहे. आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 


संबंधित बातम्या


RRR : राजामौलींचं चाहत्यांना खास सरप्राइज, 'RRR 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दिली माहिती