एक्स्प्लोर

श्रीदेवी बॉलिवूडमधल्या अघोरी स्पर्धेची बळी?

श्रीदेवी जेव्हा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा ट्रेन्ड साऊथ इंडियन होता. पण काळ बदलत गेला तसं श्रीदेवीलाही बदलावं लागलं. धष्टपुष्ट अभिनेत्रींची सद्दी संपली आणि सडपातळ बांध्याच्या हिरॉईन्सचा जमाना आला.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या अकाली मृत्यूने संपूर्ण बॉलिवूड विश्वाला एक मोठा धक्का बसला. पण त्यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न मात्र निर्माण झाले आहेत. श्रीदेवी यांचा मृत्यू हा बॉलिवूडमधल्या अघोरी स्पर्धेची बळी होता का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. श्रीदेवी जेव्हा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा ट्रेन्ड साऊथ इंडियन होता. पण काळ बदलत गेला तसं श्रीदेवीलाही बदलावं लागलं. धष्टपुष्ट अभिनेत्रींची सद्दी संपली आणि सडपातळ बांध्याच्या हिरॉईन्सचा जमाना आला. अर्थातच या स्पर्धेत स्वतःला मेन्टेन करण्यासाठी श्रीदेवी यांना मेहनत घ्यावी लागली आणि त्याच मेहनतीनं त्यांचा जीव घेतला का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे खरं तर आपल्या तब्येतीबाबत श्रीदेवी थोडी अतिकाळजी घ्यायची असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. पण आपल्या आरोग्याबाबत इतकी सजग असलेली श्रीदेवी अशी अचानक का गेली? श्रीदेवी बॉलिवूडमधल्या अघोरी स्पर्धेची बळी? श्रीदेवीच्या मृत्यूची पहिली शंका श्रीदेवीच्या मृत्यूचा शोध घेताना फिल्मी दुनियेतली कुजबुज कानी पडली. काही न्यूज वेबसाईट्सच्या मते श्रीदेवी आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काही औषधे घेत असे. याच औषधांचं अतिरिक्त सेवन हे हृदयासाठी घातक असतं आणि त्याच औषधांनी घात केल्याचा संशय आहे. श्रीदेवी बॉलिवूडमधल्या अघोरी स्पर्धेची बळी? श्रीदेवीच्या मृत्यूची दुसरी शंका या इंडस्ट्रीत स्वतःला मेन्टेन करायचं असेल, तर हिरॉईन्सना कायम टोन्ड शेपमध्ये आणि आकर्षक चेहऱ्यानंच वावरावं लागतं हे कटू सत्य आहे. त्याच मान्यतेपोटी श्रीदेवीनंही आपल्या चेहऱ्यात अनेक बदल करुन घेतल्याची चर्चा इंडस्ट्रीमध्ये आहे. सूत्रांच्या मते, काही महिन्यांपूर्वी श्रीदेवीने आपल्या ओठांवर सर्जरी करुन घेतली होती. त्या सर्जरीमध्ये काही चुका झाल्या होत्या आणि त्याच दुरुस्त करण्यासाठी श्रीदेवी दुबईमध्ये थांबल्या होत्या असं बोललं जातं. त्यामुळे त्याच सर्जरीसाठी लागणाऱ्या औषधांनी त्यांचा जीव घेतला का? अर्थात श्रीदेवीने प्लॅस्टिक सर्जरी केली होती, की नाही याची स्पष्ट माहिती नसल्याने यावर शिक्कामोर्तब करणं योग्य नाही. श्रीदेवी बॉलिवूडमधल्या अघोरी स्पर्धेची बळी? श्रीदेवीच्या मृत्यूची तिसरी शंका गेल्या काही दिवसांपासून श्रीदेवीने स्वतःला स्लिम-ट्रिम ठेवण्यासाठी क्रॅश डाएटिंग सुरु केल्याची चर्चा होती. तिचं खाणं प्रचंड रोडावल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे श्रीदेवीच्या मृत्यूमागे हे तर कारण नसावं? श्रीदेवीच्या मृत्यूचं कारणं काहीही असलं, तरी श्रीदेवी या जुलमी स्पर्धेचा बळी होती, असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. या इंडस्ट्रीमध्ये सुडौल आणि मादक बांधा, सुंदर चेहरा आणि सुरकुत्या नसलेल्या चेहऱ्यांवरच स्पॉटलाईट पडतो. हिरॉईनचा चेहरा सुरकुतला की तिच्या नशिबालाही सुरकुत्या पडतात. ललाटीचं नशीब पुसलं जाऊ नये म्हणून तर श्रीदेवी धावत नव्हती? आणि तिचं तेच धावणंच तिच्या जीवावर बेतलं नाही ना? आरोग्यापेक्षा श्रीदेवीनं सौंदर्याला जास्त महत्त्व तर दिलं नाही ना? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत. कारण ती ‘सदमा’तल्या हिरॉईनसारखी निघून गेली आणि तिच्या दु:खात तिचे चाहते कमल हसनसारखे सैरभैर झाले आहेत. संबंधित बातम्या :

नवा दावा - श्रीदेवींना बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत हॉटेल स्टाफने पाहिलं!

श्रीदेवी यांना हृदयासंबंधी कोणताही विकार नव्हता : संजय कपूर 'श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या', खलीज टाइम्सचा दावा

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन

अर्जुन कपूरसोबत घडलं, तोच दुर्दैवी योगायोग जान्हवीसोबत

नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये... श्रीदेवींच्या निधनावरील शोकसंदेशाने काँग्रेस ट्रोल श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार म्हणून जान्हवीने तीन दिवस आईशी बोलणं टाकलं श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार 'रुप की रानी' श्रीदेवी यांची कारकीर्द लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट दुबईतील लग्नसोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे फोटो बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण?

महत्त्वाच्या बातम्या

दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
Kushal Badrike on Shourya Ambure: युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
Deool Band Actress: 'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
Sameera Reddy Nana Patekar Death: बॉलिवूड अभिनेत्रीकडून नाना पाटेकरांबाबत अनेक रहस्य उघड; मृत्यूच्या 1 महिन्यांनंतर सगळंच सांगितलं, म्हणाली, 'ते गुपचूप...'
बॉलिवूड अभिनेत्रीकडून नाना पाटेकरांबाबत अनेक रहस्य उघड; मृत्यूच्या 1 महिन्यांनंतर सगळंच सांगितलं, म्हणाली, 'ते गुपचूप...'

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Embed widget